गुरुवार, 8 अक्तूबर 2009

मनसेला १२ जागा

मुंबई, १८ ऑक्टोबर
* काँग्रेस आघाडीला १४० जागा, युतीला ११८ तर मनसेला १२ जागा
* स्टार माझा- नेल्सनच्या निवडणूकपूर्व जनमत चाचणीचा निष्कर्ष
पुढच्या आठवडय़ात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही आघाडीला निर्विवाद बहुमत मिळण्याची शक्यता नसली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी १४० जागा जिंकून सत्तेच्या समीप जाईल, असा निष्कर्ष स्टार माझा आणि नेल्सन यांच्या निवडणूकपूर्व जनमत चाचणीतून स्पष्टपणे समोर आता आहे. शिवसेना-भाजप युतीच्या पारडय़ात ११८ जागा पडतील, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना १२ जागा जिंकण्यात यशस्वी होईल, असेही या चाचणीत दिसून आले आहे. विधानसभेच्या या रणधुमाळीमध्ये काँग्रेस पक्ष अपेक्षेप्रमाणे मोठी बाजी मारण्याची चिन्हे आहेत. या पाहणीनुसार काँग्रेस पक्षाला तब्बल ८८ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ५२ जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला ६३ तर भाजपाला ५५ जागा जिंकून राष्ट्रवादीला मागे टाकल्याचे समाधान मिळू शकेल. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि रिपब्लिकन डाव्या लोकशाही समितीच्या कामगिरीकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. या पाहणीनुसार मनसेला १२ तर रिडालोसला सहा जागा मिळतील. अपक्ष आणि इतरांच्या वाटय़ाला १२ जागा जातील, अशी अपेक्षा आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज ठाकरे यांचा प्रभाव ओसरला आहे का, या प्रश्नाला ३८ टक्के मतदारांनी होकारार्थी उत्तर दिले. ६२ टक्के मतदारांनी मात्र राज यांची जादू कायम असल्याचे मत नोंदविले. या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा महागाईचा असल्याचे आढळून आले असले तरी बहुसंख्य मतदारांनी त्याबद्दल काँग्रेला जबाबदार धरलेले नाही. विशेष म्हणजे, मराठी माणसाची अस्मिता हा या निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा असल्याचे मत ५४ टक्के  मतदारांनी नोंदविले आहे.                       
(ref loksatta)
तुम्हाला काय वाटते मनसे ला किती जागा भेटतील ? कमेन्ट करा

10 टिप्‍पणियां:

 1. manase cha ek umedwar mumbai la bombay mhantoy,ekane hindiun jahirnama kadhlay ,eka hindi mansala umedwar kelay yala kay mhnva?
  raj thakre jindabad

  उत्तर देंहटाएं
 2. manase la mazya andaze 20/40 aamdar miltil

  उत्तर देंहटाएं
 3. shivaji park warche bhashan upload kar

  उत्तर देंहटाएं
 4. MANASE CHE SARV AAMDAR NIVDUN YEVO, MAHARASHTRA LA TUMCHYA NETRUTVACHI GARAJ AAHE

  उत्तर देंहटाएं
 5. MAHARASHTRA NAV NIRMAN SENA WILL GET 30-40 SEATS ... BELIEVE ME ... MY PREDICTION WILL COME TRUE .. RAJ SAHEB JINDABAD .. RAJ SAHEB JINDABAD .. RAJ SAHEB JINDABAD ..

  उत्तर देंहटाएं
 6. are yeun yeun yenar raj sahebansivay aahech kon?
  purn life madhe mala ekach mansala saheb mhanavasa wattat te mhnje raj saheb

  उत्तर देंहटाएं
 7. nilesh mazi pan tich ichha aahe pan madhlya kalat manaase chi khup badnami zali
  ex .manase cha ek umedwar hindi aahe tyala marathi yat nahi ,ek umedwar mumbai la bombay mhantoy, tari pan mi mhanen ki raj sahebannch mat dya karan maza tyanchyawar (purn maharashtracha)vishwas aahe

  उत्तर देंहटाएं