मंगलवार, 27 अक्तूबर 2009

राज ठाकरेंनी घेतले एकवीरा आईचे दर्शन

राज ठाकरेंनी घेतले एकवीरा आईचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, October 27th, 2009 AT 1:10 PM
लोणावळा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) येथील एकवीरा देवीचे दर्शन घेतले. एकवीरा देवी ही ठाकरे घराण्याची कुलदेवी आहे. दर्शनासाठी आलेल्या राज यांनी या वेळी मात्र कोणतेही राजकीय भाष्य केले नाही.
ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत यश मिळावे, असे साकडे देवीला घातले नव्हते. मात्र, दर्शन घेण्याची इच्छा झाली म्हणून आज आलो.
राज ठाकरे एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येणार असे कळल्याने सकाळपासूनच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. मनसेचे आमदारही या वेळी उपस्थित होते. राज यांचे आगमन होताच फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता.
देवीचे दर्शन तसेच आरती करून राज माध्यमांना सामोरे गेले. तेथे उपस्थित असलेले आमदार रमेश वांजळे यांना त्यांनी फटकारले. लवकरात लवकर दागिने काढा, असे वांजळे यांना बजावले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें