शनिवार, 24 अक्तूबर 2009

राज ठाकरे यांची वांजळे यांना साधे राहण्याची सूचना
सकाळ वृत्तसेवा
Saturday, October 24th, 2009 AT 12:10 AM



खडकवासला - खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनिर्वाचित आमदार रमेश वांजळे आता आपल्या अंगावरील दोन किलो सोन्याचे दागिने काढून ठेवणार आहेत. त्याबाबत त्यांना "मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सूचना केल्याचे समजते.
निवडणुकीत निवडून आल्यानंतर श्री. ठाकरे यांना भेटण्यासाठी आमदार वांजळे शुक्रवारी सकाळीच मुंबईला रवाना झाले होते. श्री. ठाकरे यांच्या निवासस्थानी आमदार वांजळे यांनी भेट घेतली. या वेळी त्यांच्याबरोबर मतदारसंघातील काही कार्यकर्ते व पत्नी बरोबर होती. त्यांनी अंगावर दोन किलो सोने घातले आहे. यामुळे त्याची चर्चा सध्या देशभर गाजत आहे.
""राहणी साधी ठेवा. गोरगरीब, गरजू लोकांची सेवा करा. पक्षाचे काम सामान्य जनतेपर्यंत पोचवा. जनतेने मोठा विश्‍वास तुमच्यावर दाखविला आहे. त्यामुळे त्यांच्या विश्‍वासाला सार्थ ठरण्यासाठी तुम्हीही मोठे काम उभारून दाखवा,'' अशी सूचना ठाकरे यांनी या वेळी आमदार वांजळे यांना केली. त्यानुसार वांजळे येत्या काही दिवसांत गळ्यातील व हातातील सोन्याचे दागिने काढूनच विधानसभेच्या सभागृहात प्रवेश करणार असल्याचे समजते. याबाबत आमदार वांजळे येत्या दोन दिवसांत निर्णय जाहीर करण्याची शक्‍यता आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें