मंगलवार, 15 दिसंबर 2009

राज ठाकरेंचे विदर्भात उत्साहात स्वागत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, December 15, 2009 AT 02:25 AM (IST)


नागपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज सकाळी नागपुरात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी विमानतळावर प्रचंड गर्दी केली. दिवसभर ते सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या प्रश्‍नावर ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे आज सकाळी आठ वाजता, शहरात येणार होते. त्यांच्या विमानास तब्बल तासभर उशीर झाला. तोवर मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात विमानतळावर जमले होते. घोषणाबाजी करीत होते. राज ठाकरेंचे आगमन होताच, ढोलताशांच्या गजरात, फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते आणि त्यांचे छायाचित्र घेण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी समोर सरकले. तोवर सीआयएसएफच्या जवानांनी त्यांना कडे केले. " येणाऱ्या प्रत्येकांना मला भेटू द्या' असा आग्रह राज ठाकरे धरत होते. कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांना फुले, पुष्पगुच्छ देण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिस त्यांना ढकलत होते. हा प्रकार बघून प्रशांत पवार पोलिसांवर आक्षरशः धावून गेले. त्यांची पोलिसांशी झटापट झाली. त्यांच्या डोळ्याला इजा झाली.

1 टिप्पणी:

  1. राज साहेबाना नमस्कार .........महारष्ट्र तुमच्याकडे खूप आशेने बघत आहे ......महाराष्ट्रला एकच राहूद्या हीच विनंती ..सत्तेसाठी तुकडे करू नका....... जय भवानी जय शिवाजी

    उत्तर देंहटाएं