मंगलवार, 15 दिसंबर 2009

स्वतंत्र विदर्भासाठी गरज भासल्यास सार्वमत घ्या - राज

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, December 15, 2009 AT 01:39 PM (IST)

नागपूर - विकासासाठी राज्याचे विभाजन मान्य नसल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा फेटाळला. विदर्भ वेगळा करायचाच असेल तर त्यासाठी सार्वमत घ्या, अशी मागणी त्यांनी आज टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेत केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि नक्षलवादावरही त्यांनी मत मांडले.

केंद्र सरकारने तेलंगणा राज्यनिर्मितीस हिरवा कंदील दाखविल्यानंतर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीने जोर धरला. या मागणीचे इतर पक्षांनी समर्थन केले तर शिवसेनेने विरोध दर्शविला. मनसेची भूमिका मात्र गुलदस्त्यात होती. मनसे आमदार "भूमिका साहेब स्पष्ट करतील' असे सांगत होते. त्यामुळे राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या पार्श्‍वभूमीवर ठाकरे यांनी आज स्वतंत्र विदर्भाला स्पष्ट विरोध दर्शविला. महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असताना त्याच्या विभाजनाची मागणी योग्य नसल्याचे मत त्यांनी प्रारंभीच मांडले. वेगळ्या राज्याच्या मुद्द्याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नोंदविलेले निष्कर्ष पत्रकारांकडून उपस्थित झाल्याचे पाहून त्यांनी "त्यावेळेची स्थिती वेगळी होती. आता बाबासाहेबांना या विषयात उपस्थित करू नका', असे सांगितले. "हा विषय वेगळ्या वळणावर नेऊ नका, तुम्ही माझ्याकडून काहीही वदवून घेऊ शकणार नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले.

विदर्भात ज्या पक्षाला भरभरून मते मिळाली, ज्यांचे आमदार, खासदार सर्वाधिक काळ विदर्भातून निवडून आले, त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना या मुद्द्यासाठी धारेवर धरावे, असा सल्लाही त्यांनी दिला. ठराविक "कोंडाळे'च हे तुणतुणे वाजवत असल्याचे ते म्हणाले. सर्वाधिक काळ सत्तेत असणाऱ्यांनी ज्या पद्धतीने बारामतीचा विकास घडविला तो विकास उर्वरित महाराष्ट्रात का झाला नाही, असा प्रश्‍न करून "मतदारांनी डॉक्‍टर बदलविण्याची गरज आहे', असे मत त्यांनी नोंदविले. व्यसनापोटी शेतकरी आत्महत्या करतात, हे मला मान्य नसल्याचे राज म्हणाले. वर्षानुवर्षे होणारा अन्याय, त्यामुळे वैदर्भीयांच्या मनात असलेली खदखद, राग समजून घ्यायचा आहे. येथील ज्वलंत प्रश्‍न समजून त्यावर काय उपाय करता येईल, याचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर "विदर्भ विकासाचा अजेंडा' तयार करेन, असे ते म्हणाले.

नक्षलवाद्यांमध्ये कोण आहे, त्यांची पाठराखण कोण करीत आहेत, ते समजून घेण्याची आवश्‍यकताही त्यांनी विदित केली. संसदेवरील हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला केवळ 14 खासदार उपस्थित राहत असतील तर त्यांची संवेदनशीलता लक्षात घ्यावी, असेही राज म्हणाले.

नेते आणि बिल्डरांमधील साटेलोटे उपस्थित करून राज यांना बोलते करण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. मात्र, त्यावर त्यांनी थेट बोलण्याचे टाळले. विदर्भातच काय, कृष्णा खोरे बांधकामातही भ्रष्टाचार झाल्याचे ते म्हणाले. हे प्रश्‍न वारंवार येत असल्याचे पाहून त्यांनी "तुम्हाला माझ्याकडून अविनाश भोसलें'चे नाव वदवून घ्यायचे आहे काय, असा प्रश्‍नही त्यांनी केला.

चौफेर फलंदाजी
राज यांनी नेहमीप्रमाणे आपल्या खास शैलीत आज पत्रकारांना टोलवले. एका प्रश्‍नावर त्यांनी "वाद घालता की प्रश्‍न करता', असा सवाल केला. तर, येथील पत्रकारांना बोलू द्या, उद्या तुमच्याशी मुंबईत बोलेन, अशी गुगली मुंबईच्या पत्रकारांना टाकली. पत्रकार संघाचे मंचावरील प्रतिनिधी प्रश्‍न करीत असल्याचे पाहून "मला चक्क घेरलं तुम्ही', असे म्हणत त्यांनी हशा पिकवला. छायाचित्रकारांना "पुरे आता' म्हणत थांबविले. छोट्या राज्यात कसा मोठा भ्रष्टाचार होतो, त्याचे उदाहरण मधू कोडाच्या रूपातून पाहा, असे सांगून लगेच "हा विनोद होता' अशी पुष्टीही जोडली. बाळासाहेबांचे उत्तर मी कसे देणार, असा प्रतिप्रश्‍न एका प्रश्‍नाच्या उत्तरादाखल त्यांनी केला. "तुम्हाला धमकी आहे. त्यासाठी बिहारमधून पाच जण आलेत. याबाबत काय,' या प्रश्‍नावर त्यांनी "आता धमकीच्या निमित्तानेही "ते' महाराष्ट्रात येत आहेत' असे म्हणत खसखस पिकवली. हे लिहू नका, असे सांगतानाच त्यांनी "मीडियाला सल्ला दिला म्हणून चौकट छापू नका', अशीही कोटी केली.
विदर्भाचा विकास झाला नसल्याचे मान्य आहे. मात्र, त्याच्या विकासासाठी राज्याचे विभाजन पर्याय ठरू शकत नाही. मेंदूला रक्तस्त्राव होत नाही म्हणून, डॉक्‍टर बदलणे समजण्यासारखे आहे. मात्र, मुंडकेच छाटणे हा उपचार कसा ठरू शकतो?
- राज ठाकरे.

4 टिप्‍पणियां:

 1. सार्वमताचा निर्णय योग्य आहे

  उत्तर देंहटाएं
 2. कोण आहे हा राज ठाकरे ?
  का करतोय हा स्वताहाची मनमानी ?
  का दमदाटी करतोय हा लोकांवर
  का मारतोय हा बिहारी लोकांना बाहेर काढून ?
  का ह्या महाराष्ट्रातल्या दुकानावार्च्या पाट्या मराठीतून करतोय ?
  आरे त्याला म्हणाव दुसरे पण आहे ह्या महाराष्ट्रात
  हा महाराष्ट्र काही त्याचा एक्त्याचाच नाही आहे
  याला काय वाटत याच राज्य चालू आहे महाराष्ट्रात
  त्याला कसली ही भीती नाही वाटत का ?
  त्याला कोणाचा आहे पाठिंबा कोण आहे त्याच्या पाठीशी
  एकट्याच्या जिवावर काय करू शकेल हा ?
  त्याला काय वाटत एकटा लढून हा का मराठीला वाचणार
  तो एकता नाही वाचवू शकणार मराठीला, मतिला कारण
  तो एकता काय काय करू शकणार आहे त्याला समजायला हव
  हे सगळे प्रश्न आपण स्वतहाला विचारायला पाहिजे की
  तो एकटा माणुस आपल्या मायबोली साठी लाठ्तोय आणि आपण
  रोज रात्रि टीवी लावून मज़ा बघतोय
  तो एक मेव माणुस लाठ्तोय पण आपण काहीच करत नाही
  का स्वताहाचा जिव मुठीत लाठ्तोय एकटा जर आपलेच लोक
  त्याचा बरोबर नाही तर
  अरे उठा त्याना आपली गरज आहे जर तुम्ही खरे मराठी आहात
  तर माझी विनंन्ति आहे आपण त्याची मदत करायला हवी
  चला आपली मराठी आपनच वाचू......अशावेळी तुला नक्की राज ठाकरे आठवतील!!!....अशावेळी तुला नक्की राज ठाकरे आठवतील!!!...:):):)
  जय महाराष्ट्र !!!.................

  उत्तर देंहटाएं
 3. अशावेळी तुला नक्की राज ठाकरे आठवतील!!!....अशावेळी तुला नक्की राज ठाकरे आठवतील!!!...:):):)
  जय महाराष्ट्र !!!........
  ¤ !!बघ तुला राज ठाकरे आठवतील !! ¤

  रस्त्यावर चालताना आजूबाजूला तुला फक्त
  भैयाच दिसतील, रिक्षात बसलास तरी ती रिक्षा भैयाचीच असेल,त्याच रांगेत थांबलेला पण कुठेतरी शेवटी उभा दिसेल, बघ तुला राज ठाकरे आठवतील !
  भारती घ्यायला महाविद्यालयात मध्ये जाशील, रांगेत उभा राहून फोरमा घेशील, तो भरून भरला ही करशील,पण ज्या वेळेस यादी लागेल,त्यात तूझे नाव नसेल,तुझे गुण पण चांगले असतील,पण कोणत्यातरी परक्यांनी येऊन अगोदरच...... डोनेशन च्या नावाखाली जागा बर्लेल्या केल्या असतील,बघ तुला राज ठाकरे आठवतील !
  ... तुझ्याकडे एखादी चांगली पदवी असेल, १स्त क्लास विथ डीश्र्टीण्टीण ही असेल,पण मराठीमुळे नाकारला होशील,तुझ्या हक्काची नोकरी दुसरा कोणी घेऊन जाईल,पण तू मात्र निराश होऊन घरी परतशील,आईजवळ जाऊन तिला सांगशील,"आज मी परत हारलो" ,मग ती तुला धीर देईल,उद्या पुन्हा प्रयत्न कर असे सांगेल, पण उद्याही कोणता एक परका तुझी नोकरी घेऊन जाईल, बघ तुला राज ठाकरे आठवतील !
  बाहेर रस्तावर जिकडे बघशील,तुला सारे परकेच दिसतील,भाजी घ्यायला गेलास तर भाजीवाला भैया,धोब्याकडे गेलास तर धोबी भैया,रिक्षावाला भैया,आईस्क्रीमवाला भैया, आणि न जानो किती भैया? तुला असेच भेटतील, आणि तुझ्याच हातांनी तुझ्याच पायावर दगड पाडून घेशील अशावेळी तुला नक्की राज ठाकरे आठवतील!!!
  म्हणूनच बघताय काय? आजच सामील व्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत!
  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करा आणी
  मराठी आस्मितेची शान राखा!
  जय महाराष्ट्र !!!..

  उत्तर देंहटाएं