शनिवार, 6 मार्च 2010

राज ठाकरे लढताहेत ७३ खटल्यांविरुद्ध

राज ठाकरे लढताहेत ७३ खटल्यांविरुद्ध

Sunday, March 07, 2010 AT 11:36 AM (IST)

मुंबई - मराठीच्या मुद्‌द्‌यावरून परप्रांतियांना मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर महाराष्ट्रातील विविध न्यायालयात ७३ खटले दाखल चालू असल्याचे आज (रविवार) पोलिसांनी सांगितले.

उत्तर भारतीयांविरुद्ध २००८मध्ये पुकारलेल्या आंदोलनावेळी घडलेल्या घटनांमध्ये राज ठाकरे यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे गुन्हे त्यांच्यावर नोंदविण्यात आले आहेत. राज ठाकरेंवर दाखल करण्यात आलेल्या ७३ खटल्यांपैकी सहा खटल्यांमध्ये त्यांना जामीन मिळाला आहे. नुकतीच राज ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील भडगाव आणि चोपडा न्यायालयात हजर राहून जामीन मिळविला होता. तसेच चार गुन्हे नोंद असलेल्या गंगापूर येथील न्यायालयातही ते हजर राहिले होते. या सर्व गुन्ह्यांविरुद्ध लढण्यासाठी राज ठाकरे यांनी प्रसिद्ध फौजदारी वकील सयाजी नांगरे यांनी नेमणूक केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें