सोमवार, 16 अगस्त 2010

माओवाद्यांनी केली मनसेच्या नेत्याची हत्या

माओवाद्यांनी केली मनसेच्या नेत्याची हत्या
सकाळ वृत्तसेवा
Monday, August 16, 2010 AT 05:24 PM (IST)
 

धानोरा (जि.गडचिरोली) - पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी मनसेच्या तालुका उपाध्यक्षाची गळा चिरून हत्या केली. ही घटना रविवारी (ता.15) च्या रात्री माळंदा येथे घडली. दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या रात्री माओवाद्यांनी धानोरा येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या आवारात तसेच जपतलाई व हेटी या गावातली काळे ध्वज फडकविल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

जंगलू पदा (60 ) असे मृतकाचे नाव असून, ते धानोरा तालुका आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष होते. राज्य शासनाने त्यांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. जंगलू पदा रविवार (ता.15) रात्री घरी झोपले असता 200 ते 250 शस्त्रधारी माओवादी त्यांना झोपेतून उठविले व घराबाहेर नेऊन धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. शनिवारच्या रात्री माओवाद्यांनी धानोरा पोलिस ठाण्यापासून एक किमी अंतरावर ग्रामपंचायतीच्या आवारात काळा झेंडा फडकविला. त्यानंतर गावकऱ्यांनी काळा ध्वज उतरवून त्या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकविला. पोलिस ठाणे तसेच सीआरपीएफ जवान असतानाही धानोरा शहरात माओवाद्यांनी काळा ध्वज फडकविल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 
 


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें