बुधवार, 18 अगस्त 2010

"मनसे'आमदार प्रवीण दरेकर यांना जामीन

"मनसे'आमदार प्रवीण दरेकर यांना जामीन
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, August 18, 2010 AT 01:15 PM (IST)


मुंबई - कांदिवलीतील "सिनेमॅक्‍स'मध्ये केलेल्या तोडफोडप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार प्रवीण दरेकर यांना न्यायालयाने जामीन दिला आहे.
तत्पूर्वी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी दरेकर यांना "कोर्टऍरेस्ट' करून बोरिवली येथील न्यायालयात हजर केले. त्यावर न्यायालयाने त्यांची 5 हजार रुपयाच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर जामीनावर सुटका केली.

मल्टिप्लेक्‍समध्ये मराठी चित्रपट दाखवले जात नसल्याबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता. मल्टिप्लेक्‍स मालकांचा उर्मटपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगत प्राईम टाईमला मराठी चित्रपट दाखवलेच पाहिजेच असा इशारा दिला होता.

दोन दिवसांपूर्वी कांदिवलीच्या सिनेमॅक्‍स मल्टिप्लेक्‍समध्ये घुसून मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. त्यासंदर्भात पोलिसांनी दरेकरांना आज अटक करून न्यायालयात हजर केले. या प्रकरणी या पूर्वी मनसेच्या 22 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें