मंगलवार, 4 जनवरी 2011

शिवसेनेची मनसेला ऑफर?

शिवसेनेची मनसेला ऑफर?

Wednesday, January 05, 2011 AT 12:00 AM (IST)


डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक 7 जानेवारी रोजी होत असून मनसेने पहिले अध्यक्षपद घ्यावे, यासाठी शिवसेनेकडून त्यांना ऑफर देण्यात येत आहे. मात्र, अध्यक्षपद स्वीकारावे किंवा नाही, याबाबत एकमत होत नसल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांची द्विधा मनःस्थिती झाली आहे. स्थायी समिती सभापती पदावरून पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघण्याची चिन्हे आहेत.

पालिकेच्या पहिल्या महासभेत स्थायी समिती सदस्यांची निवड झाली असली, तरी स्थायी समिती सभापतींची निवड अजून बाकी आहे. ही निवड आता 7 जानेवारी रोजी होणार आहे. शिवसेनेतर्फे जनार्दन म्हात्रे यांचे नाव चर्चेत असून मनसेकडून सुदेश चुडनाईक यांचे नाव पुढे आले आहे. मात्र, मनसेने अध्यक्षपद स्वीकारावे असा आग्रह शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून होत असून शिवसेनेचे काही कार्यकर्ते याला दुजोरा देत आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठींनी सर्वच बाबतींत तटस्थ राहण्याचे आदेश दिल्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे. दुसरीकडे आपल्याशिवाय दुसऱ्या कोणालाही अध्यक्षपद मिळू नये यासाठीच शिवसेनेकडून शॉर्ट नोटीस देण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे.

शिवसेनेच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेला अडचणीत आणण्यासाठीच त्यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचे गाजर दाखविण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे बोलले जात आहे. मनसेला सत्तेत सामावून घेतल्यास शिवसेनेला फायदा होणार असला, तरी पूर्ण सत्ता आल्याशिवाय सत्ता स्वीकारायची नाही, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच दिले आहेत. एकीकडे समोरून आलेली सत्ता आणि दुसरीकडे पक्षादेश या कात्रीत मनसे पदाधिकारी सापडले आहेत. यावर अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचाच असणार आहे. यामुळे मनसे शिवसेनेच्या या डावात फसेल, असे चित्र सध्या तरी दिसत नाही.
याबाबत मनसेचे आमदार रमेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, काहीही घडू शकते असे संकेत दिले. मात्र, शिवसेना नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत अध्यक्ष आपलाच होणार असल्याचे सांगितले आहे.

अध्यक्षपदासाठी कॉंग्रेस आघाडीकडून विश्‍वनाथ राणे व भरत पाटील यांची नावे चर्चेत असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें