शनिवार, 8 जनवरी 2011

मनसे आमदार मारहाणीचा सेनेकडून निषेध

मनसे आमदार मारहाणीचा सेनेकडून निषेध
सकाळ वृत्तसेवा
Saturday, January 08, 2011 AT 04:43 PM (IST)

मुंबई - मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. याप्रकरणी जाधव यांची बाजू ऐकून घेण्यासाठी शिवसेनेचे एक पथक औरंगाबादला पाठविण्याची त्यांनी घोषणा केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले,""मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा आम्ही तीव्र निषेध करतो. मारहाणीस जबाबदार असलेल्या पोलिसांना गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी पाठवायला हवे. पोलिसांची अरेरावी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही.''

दरम्यान, जाधव यांची बाजू ऐकून घेण्यासाठी शिवसेनेना आमदारांची तीन सदस्यीय समिती औरंगाबादला जाणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें