मंगलवार, 17 जनवरी 2012

राज ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका

राज ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, January 17, 2012 AT 01:04 PM (IST)
ठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) निवडणूक आयोगावर टीका करीत, निवडणूक आयोगाने दबावाखाली काम करू नये असे म्हटले आहे. तसेच मतदानादिवशीच मतमोजणी घेण्याची मागणी त्यांनी केली.

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ''निवडणूक आयोगाचे काम राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मदत करणारे आहे. त्यांनी कोणत्याही दबावात काम करू नये. आयोगाला मतदान यंत्राची अडचण दूर करणे शक्य असून, दुसरय़ा राज्यातून मतदान यंत्रे आणणे शक्य आहे.''

परीक्षेशिवाय तिकीट नाही, असे पुन्हा एकदा स्पष्ट करीत राज ठाकरे यांनी सांगितले, की दुसऱ्या पक्षातून मनसेत प्रवेश केलेल्यांना परीक्षा देणे आवश्यक आहे. ठाण्यामध्ये मनसेमध्ये कोणतेही मतभेद नसून, पक्षात संघटनात्मक बदल करणे आवश्यक आहे. पक्षातील उमेदवारांचाच आगोदर विचार केला जाईल.  ठाणेकरांना मनसेशिवाय पर्याय नाही. अतिक्रमण हटविता येत नसल्याने मुंबई आणि ठाण्यामध्ये स्कायवॉक बांधण्यात आले. मात्र, याचा काही उपयोग नाही. सत्ताधारी विरोधकांमुळे ठाण्याचा विकास खुंटला आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें