रविवार, 19 फ़रवरी 2012

मनसेचा पहिला महापौर नाशिकमध्येच - राज

मनसेचा पहिला महापौर नाशिकमध्येच - राज
- सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 19, 2012 AT 11:21 AM (IST)
  
नाशिक - नाशिक महानगरपालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यातील पहिला महापौर नाशिकमध्येच होणार असल्याचे, आज (रविवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर प्रथमच राज ठाकरे आज नाशिकमध्ये आले होते. नाशिकमध्ये राज ठाकरे यांचा पूर्वीपासूनच प्रभाव आहे आणि तो या निवडणुकीतही सिद्ध झाला आहे.

नाशिकमधील जनतेचे आभार मानत राज ठाकरे म्हणाले, ''सत्तेसाठी चुकीचा निर्णय घेऊन जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रचारासाठी आणखी वेळ मिळाला असता तर काही जागा वाढल्या असत्या. काही महापालिकांसाठी आघाडीचे नेते माझ्या संपर्कात असले तरी, मी कोणाच्या संपर्कात आहे हे आताच स्पष्ट करणार नाही. मी आज फक्त माझ्या नगरसेवकांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. नाशिकमधील जनतेला हेवा वाटेल असे काम करून दाखवू.कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें