मंगलवार, 6 मार्च 2012

ठाण्यात मनसेचा शिवसेनेला पाठिंबा- राज ठाकरे

ठाण्यात मनसेचा शिवसेनेला पाठिंबा- राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, March 06, 2012 AT 01:47 PM (IST)

ठाणे- ठाणे महापौरपदासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना-भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवेसनेच्या तीन आमदारांनी आज सकाळी आपली भेट घेतल्याचे राज यांनी सांगितले.

राज ठाकरे म्हणाले, "ठाण्याचा विकास व्हावा ही बाळासाहेबांची इच्छा आहे. बाळासाहेबांच्या इच्छेचा आपल्याला आदर आहे. ठाण्यात मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. पण, ही भविष्यातील युती नसून, हा पाठिंबा म्हणजे सत्तेत सहभागी होण्यासाठी नाही. पुण्यात विरोधी पक्षनेता मनसेचा होणार आहे. माझ्या पक्षाला विकासाची कामे करायची आहेत. पक्षाकडे पाहण्याची गरज असल्यामुळे एप्रिलमध्ये ठाणे व नवी मुंबईत पक्षात साफसफाई करणार आहे. या निवडणुकीने आपल्याला बरेच काही शिकवले आहे. नाशिकमध्य़े जनादेश माझ्या बाजूने आहे. नाशिकच्या महापौरपदासाठी वेळ पडल्यास विरोध पक्ष म्हणून बसू, पण आपण कोणाच्याही पाया पडणार नाही.



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें