रविवार, 1 अप्रैल 2012

राज ठाकरेंनी केली, हर्षवर्धन जाधवांची नाराजी दूर

राज ठाकरेंनी केली, हर्षवर्धन जाधवांची नाराजी दूर
- सकाळ वृत्तसेवा
Sunday, April 01, 2012 AT 04:15 PM (IST)


औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार) आमदार हर्षवर्धन जाधव यांची नाराजी दूर केली. तसेच, कन्नडच्या हिराजीबाबा सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारची मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. ठाकरे यांनी जाधव यांना नाशिक येथे भेटीसाठी बोलावले होते. त्यावेळी ही नाराजी दूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यांनी ही नाराजी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान व्यक्त केली होती. त्याअंतर्गत त्यांच्या दोन सदस्यांनी आघाडीच्या उमेदवाराऐवजी शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराला मतदान केले होते. त्या पार्श्‍वभूमीवरच जाधव आज नाशिकमध्ये पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना भेटले. या भेटीच्यावेळी ठाकरे यांनी आमदार जाधव यांना हिराजी कारखान्याबाबत राज्य सरकारशी बोलणी करण्याचे अश्‍वासन दिल्यानंतर ही नाराजी दूर झाली

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें