सोमवार, 16 जुलाई 2012

उद्धव ठाकरेंना नेले राजने 'मातोश्री'कडे

उद्धव ठाकरेंना नेले राजने 'मातोश्री'कडे
- सकाळ वृत्तसेवा
Monday, July 16, 2012 AT 10:58 AM (IST)


मुंबई- शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना आज (सोमवार) सकाळी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अँजिओग्राफीची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास घरी सोडण्यात आले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गाडी चालवत 'मातोश्री' या त्यांच्या निवासस्थानी पोचविले.

उद्धव ठाकरे यांना आज सकाळी छातीत दुखत असल्याने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. याबद्दल माहिती मिळताच त्यांचे बंधू आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे रायगड दौरा अर्धवट सोडून उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यास मुंबईत परतले.

राज ठाकरे यांनी आज दुपारी लीलावती रुग्णालयात उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी पत्नी शर्मिला ठाकरे आणि आई कुंदा ठाकरे याही राज ठाकरे यांच्यासोबत होत्या. राज ठाकरे आज सकाळी अलिबागला कार्यकर्त्यांच्या शिबिराला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. उद्धव ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समजल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांचे शिबिर रद्द करून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले होते. दुपारी ते मुंबईला पोहोचले. त्यानंतर थेट लिलावती रुग्णालयात गेले. तब्बल साडेतीन वर्षानंतर ठाकरे बंधू भेटले आहेत. त्यानंतर ते रुग्णालयातच थांबले होते. सायंकाळी उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज दिल्यानंतर राज ठाकरेंनीच त्यांना घरी पोचविले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें