गुरुवार, 19 जुलाई 2012

राष्ट्रपती निवडणुकीत 'मनसे'ची दांडी

राष्ट्रपती निवडणुकीत 'मनसे'ची दांडी
-
Thursday, July 19, 2012 AT 04:04 PM (IST)

मुंबई- राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत 'मनसे'ने आपलं मत मनातच ठेवलंय.. म्हणजे ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही कळणार नाही! अखेरच्या घटकेला माघार घेत 'मनसे'ने मतदानाला दांडी मारली.

'मनसे'चे आमदार कोणाला मतदान करणार याबाबत राज ठाकरे यांनी मनातली गोष्ट शेवटपर्यंत गुलदस्त्यातच ठेवली होती. त्याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविले जात होते.

'मनसे'चे एकूम बारा आमदार असून, त्यांनी प्रणव मुखर्जी यांना मतदान करावे, यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते. काल (बुधवारी) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही राज ठाकरे यांना दूरध्वनीवरून संपर्क करून मुखर्जींना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार पी. ए. संगमा यांनीही राज ठाकरे यांना पाठिंब्यासाठी आवाहन केले होते. एरवी कोणत्याही विषयावर ठाम भूमिका मांडणाऱ्या 'मनसे'ने यावेळी कोणाचाही टिळा लावून घेण्याचे टाळले. त्यांचा खरा 'मनसे' उमेदवार कोण हे त्यांनाच ठाऊक

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें