बुधवार, 18 जुलाई 2012

उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया

उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया
- सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, July 19, 2012 AT 03:45 AM (IST)

मुंबई - शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी (ता. 20) अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याचे समजते. मनसेचे अध्यक्ष आणि उद्धव यांचे चुलत भाऊ राज ठाकरे या वेळी उपस्थित राहणार असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छेनुसारच दोन्ही भाऊ या आजारादरम्यान एकत्र आले आहेत. 16 तारखेला उद्धव यांच्या आजाराचे स्वरूप काहीसे चिंताजनक असल्याचे स्पष्ट होताच खुद्द बाळासाहेबांनी राज यांना बोलावून घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. माध्यमांनी अलिबाग येथे असलेल्या राज यांना दूरध्वनी केल्याची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये तीन ब्लॉक सापडले आहेत. बायपास किंवा अँजिओप्लास्टी, असे दोन पर्याय डॉक्‍टरांनी ठाकरे कुटुंबीयांसमोर ठेवले होते. त्यातील प्लास्टीच्या पर्यायाची निवड करण्यात आली आहे. गुरुवारी दर्श अमावास्येचा कालावधी संपल्यानंतर उद्या (ता. 19) उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होतील. प्रारंभिक चाचण्या केल्यानंतर शुक्रवारी सकाळी अँजिओप्लास्टी केली जाईल. डॉ. म्यॅथ्यू, डॉ. जलिल पारकर, डॉ. अजित देसाई यांचा चमू शस्त्रक्रिया करेल. बाळासाहेबांनी दूरध्वनी केल्यामुळे राज उपस्थित राहणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान, राज यांनी अलिबाग येथे मनसेच्या शिबिरात बोलताना उद्धव व माझी भेट हा व्यक्तिगत विषय आहे. यात राजकारण आणू नका, असे नमूद केले. मात्र, शस्त्रक्रियेच्या वेळी ते पूर्णवेळ उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें