मंगलवार, 18 सितंबर 2012

राज्यात परकी गुंतवणूक आवश्यक - राज

राज्यात परकी गुंतवणूक आवश्यक - राज
- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 18, 2012 AT 05:48 PM (IST)

मुंबई- केंद्र सरकारने रिलेटमध्ये परदेशी गुंतवणुकीला परवानगी दिल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या गुंतवणुकीला पूर्णपणे पाठिंबा दर्शविला आहे. राज्यात परकी गुंतवणूक आलीच पाहिजे, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

राज ठाकरे म्हणाले, 'थेट परकी गुंतवणुकीमुळे (एफडीआय) राज्यात रोजगार निर्माण होतील, त्यामुळे त्याला विरोध करता कामा नये. परदेशी कंपन्यांनी फक्त स्थानिक व मराठी माणसाला रोजगार द्यायला हवा. या कंपन्यांमध्ये कोणत्याही प्रकारे परप्रतीयांची भरती खपवून घेतली जाणार नाही. 'एफडीआय'मुळे नवनवीन रोजगार निर्माण होतील, त्यामुळे या गुंतवणुकीला 'मनसे' संपूर्ण पाठिंबा देत आहे. मात्र, ज्या राज्यांनी 'एफडीआय'ला विरोध केला आहे, त्या राज्यांमधील लोंढे येथे येता कामा नयेत.'

डिझेल दरवाढीला 'मनसे'ने विरोध केला असून, डिझेल दरवाढीवरील कर महाराष्ट्र सरकारने कमी करावेत. त्याचबरोबर 'भारत बंद'मध्ये मनसे सहभाग घेणार नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले






कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें