मंगलवार, 25 सितंबर 2012

अजित पवारांचा राजीनामा ही नौटंकी - राज

अजित पवारांचा राजीनामा ही नौटंकी - राज
- सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, September 26, 2012 AT 04:00 AM (IST)
मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनामा अस्त्राकडे राज्यातील राजकीय भूकंप म्हणून पाहिले जात असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या राजीनाम्याची संभावना "नौटंकी' म्हणून केली आहे; तर शिवसेनेच्या वतीने हा राजीनामा म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमधील अंतर्गत कलहाचा परिपाक असल्याची टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी या राजीनाम्याच्या विषयावर अधिक भाष्य टाळून आपली प्रतिक्रिया केवळ "नौटंकी' एवढेच असल्याचे स्पष्ट केले; तर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी हा राजीनामा म्हणजे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एकमेकांवरील कुरघोडीचा परिपाक असल्याचे सांगितले. गेली 15 वर्षे महाराष्ट्रात हे दोन्ही पक्ष केवळ एकमेकांचे पाय खेचण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्याचीच परिणती म्हणून हा राजीनामा देण्यात आला असल्याची टीका त्यांनी केली

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें