शुक्रवार, 7 सितंबर 2012

‘महाराष्ट्र’की ‘मांडवली’धर्म ?

 ‘महाराष्ट्र’की ‘मांडवली’धर्म ?
राज ठाकरेंच्या विरोधात काँग्रेस आक्रमक
खास प्रतिनिधी
मुंबई
आधी विरोध करून मग ‘सूरक्षेत्र’ या कार्यक्रमाला मान्यता देण्यात राज ठाकरे यांचा ‘महाराष्ट्र’ की  ‘मांडवली’ धर्म आहे, असा सवाल काँग्रेसने आज केला आहे. तर प्रक्षोभक भाषणाबद्दल राज ठाकरे यांच्या विरोधात कारवाईची मागणी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज ठाकरे यांनी टोल नाक्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले. पण या आंदोलनाचे आता काय झाले, असा सवाल काँग्रेसने केला आहे. राज ठाकरे हे अचानक आक्रमक होतात आणि नंतर एकदम थंड कसे होतात याचे गुपित काय, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते संजय दत्त आणि जनार्दन चांदूरकर यांनी केला आहे. बिहार दिन, टोल आंदोलन यावरून राज ठाकरे हे कसे बदलतात हे सिद्ध झाल्याचेही काँग्रेसचे म्हणणे आहे. अन्य प्रांतीयांच्या विरोधात वक्तव्य करून समाजात फूट पाडणे किंवा बंदी हुकूम मोडून मोर्चा काढल्याबद्दल राज ठाकरे यांच्या विरोधात कारवाईची मागणी प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे केली आहे. काँग्रेसने मनसेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच प्रांताच्या मुद्दय़ावर कायदा हातात घेणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. काही जण केवळ व्होटबँकेसाठी जात आणि प्रांताचा वापर करतात, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी हाणला.कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें