रविवार, 18 नवंबर 2012

बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेत राज ठाकरेंची पदयात्रा

बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेत राज ठाकरेंची पदयात्रा

- वृत्तसंस्था
Sunday, November 18, 2012 AT 03:44 PM (IST)

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे पायी चालत सहभागी झाले होते.

मातोश्री या बाळासाहेबांच्या निवासस्थानापासून सुरु झालेली अंत्ययात्रा दादरमध्ये दाखल झाल्यानंतर राज ठाकरे आपल्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानी गेले. तेथून ते शिवाजी पार्कवर येणार आहेत. दादरमधील शिवसेना भवनामध्ये बाळासाहेबांचे पार्थिव काही काळ ठेवण्यात येणार असल्याने राज ठाकरेंनी कृष्णकुंजची वाट धरल्याचे बोलले जात आहे.

अंत्ययात्रेत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासह सर्व ठाकरे कुटुंबीय बाळासाहेबांच्या पार्थिवासोबत असताना, राज ठाकरे आपल्या समर्थकांसोबत चालत आहेत. शिवाजी पार्कवरील सर्व व्यवस्थेचा आढावा घेऊन ते सकाळी आठ वाजता 'मातोश्री'वर पोचले होतेकोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें