सोमवार, 14 जनवरी 2013

गैरव्यवहाराविरोधात बार उडविणार- राज ठाकरे

गैरव्यवहाराविरोधात बार उडविणार- राज ठाकरे
  <    

- सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, January 15, 2013 AT 02:45 AM (IST)
मुंबई- "सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांच्या माध्यमातून माझ्या हातात दारुगोळा दिला आहे. त्याचा बार 10 फेब्रुवारीपासून उडवू'', अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. राज्याचा दौरा फेब्रुवारीत सुरू केल्यावर 10 जिल्ह्यांत सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कांदिवलीत प्रवीण दरेकर यांच्या आमदार निधीतून होणाऱ्या विकासकामांचा आरंभ आज राज ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी राज यांनी दौऱ्याची घोषणा केली. ""आघाडी सरकारच्या राजवटीत भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. गैरव्यवहारांची रांगच लागली आहे. हे गैरव्यवहार नागरिकांपुढे मांडण्यासाठी दौरा करणार आहे. हा दौरा मत मागण्यासाठी नसून मत मांडण्यासाठी असेल'', असे ते म्हणाले. ""मी बरेच दिवस बोललो नाही, पण आता बोलणार आहे. त्याची सुरुवात पुढील महिन्यात होईल. तुमचे आशीर्वाद सदैव माझ्यासोबत राहावेत'', असे आवाहनही यावेळी राज यांनी केले.कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें