बुधवार, 12 फ़रवरी 2014

राज ठाकरे यांची पोलिसांकडून सुटका

राज यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन वाशी टोलनाक्यावर स्वतः आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज सकाळी ते आपल्या कृष्णकुंज या निवासस्थानातून पत्नी शर्मिला व मुलगा अमितसह वाशी टोलनाक्याकडे निघाले. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो मनसे कार्यकर्ते व आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई होते. पोलिसांनी यांचा ताफा चेंबूर येथे अडवून त्यांच्यासह नांदगावकर व सरदेसाई यांनाही अटक करण्यात आली. पण, दीड ते दोन तास आरपीएफ पोलिस ठाण्यात ठेवल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

''मुख्यमंत्र्यांनी मला दूरध्वनी करून मला चर्चेसाठी आमंत्रण दिले असून, मी उद्या (गुरूवार) सकाळी नऊ वाजता त्यांच्या भेटीसाठी जाणार आहे. यावेळी मी माझे म्हणणे मांडणार आहे व त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शांतता राखावी,'' असे सुटका झाल्यानंतर राज ठाकरे यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें