रविवार, 2 फ़रवरी 2014

मुंबईत येऊन बाळासाहेबांनाच विसरता - राज

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी मुंबईत सभा घेतात आणि येथे येऊन बाळासाहेब ठाकरे यांचे नावही घेत नाही, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

मनसेने आयोजित केलेल्या जेष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. राज यांनी आपण नऊ तारखेला पुण्यात सभा घेऊन पुढील वाटचाल जाहीर करणार असल्याचे सांगितले. 

राज म्हणाले, ''मोदी मुंबईला गुजराती नागरिकांचे माहेरघर असल्याचे सांगतात. मग, महाराष्ट्रातील मराठी नागरिकांचे महाराष्ट्र हे काय सासर आहे का? गुजराती लोक गुजरातला काय म्हणतील. याठिकाणी येऊन कोणीही संयुक्त महाराष्ट्राच्या जखमांवरील खपल्या काढायचे काम करू नये.''

मुंबईत अनेक ठिकाणी जैन समाजातील नागरिकांकडून टॉवर उभारले जात आहेत. तरीही केंद्र सरकारकडून जैन समुदायाला अल्पसंख्यांकाचा दर्जा दिला गेला आहे. आज अशी परिस्थिती आहे, की लालबाग, परळ भागात मराठी माणसालाच अल्पसंख्यांकांचा दर्जा देण्याची गरज आहे, असे राज यांनी म्हटले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें