सोमवार, 2 मार्च 2015

उद्योग पळविणाऱ्यांना संधी नको- राज ठाकरे

नाशिक- खळ्‌-खट्याक आणि तोडफोडीतून मुद्दे मांडणारा पक्ष अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (ता. 1) वीज कामगारांना उठसूट संपाचे हत्यार उपसू नका आणि महाराष्ट्रातील उद्योग पळविणाऱ्यांना संधी देऊ नका, असा सल्ला दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेच्या अधिवेशनात ठाकरे बोलत होते. या वेळी मनसेचे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर, महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, माजी आमदार ऍड. उत्तमराव ढिकले, वीज कामगार नेते शिरीष सावंत, विद्यार्थी नेते आदित्य शिरोडकर उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, "पोलिस आणि वीज या दोन सेवांमधील कामकाज म्हणजे "थॅंकलेस जॉब‘ आहे. सातत्याने कामाचा ताण वाढत असलेल्या या सेवांमधील कर्मचाऱ्यांना प्रश्‍न मांडायचे तरी संपही करता येत नाही. वीज कामगारांनो उठसूट संप करू नका. राज्यातील पैसा, पाणी अन्‌ उद्योगही बाहेर वळविला जात आहेत. अशांना संधी देऊ नका. वीज माझा विषय नाही; पण शॉक देणे हा माझा विषय आहे. त्यामुळे वीज कामगारांच्या व्यथा मी समजू शकतो.‘

या अधिवेशनात विविध ठराव मांडण्यात आले. त्यात वीज कंपनीतील खासगीकरणाला विरोध करणे, कंपन्यांमधील ठेकेदारी पद्धत बंद करणे, नवीन भरतीत ठेकेदारी कामगारांना प्राधान्य देऊन कायम करणे, वीज कर्मचाऱ्यांच्या वारसांना भरतीत राखीव जागा ठेवणे, अनुकंपा वारसांना विनाअट नियुक्त करून घेणे, वीज कंपनीच्या आर्थिक बाबींशी निगडित कामे ठेकेदारांना न देता कर्मचाऱ्यांकडून करणे, पायाभूत आराखड्याची व वीज खरेदी कराराची सखोल माहिती घेऊन चौकशीची मागणी करणे, वीज कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभाग क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी विभागाकडे वर्ग करण्यास विरोध करणे आदी ठरावांचा समावेश आहे.

Visit my Blog
 Will Love you Foreva

Youtube Channel:
Youtube Channel

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें