मंगलवार, 4 अक्टूबर 2011
रिक्षाचालकांची मुजोरी चालू देणार नाही - राज
रिक्षाचालकांची मुजोरी चालू देणार नाही - राज
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, October 04, 2011 AT 04:27 PM (IST)
मुंबई - "रिक्षा चालकांचे आंदोलन म्हणजे कायदा वाकविण्याचा प्रकार आहे. रिक्षाचालकांच्या मागण्या या कायदाबाह्य आहेत, त्यामुळे मुजोरी चालू देणार नाही' असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत सांगितले.
रिक्षा चालकांना दरमहा 25 हजार रुपये मिळतील, एवढी भाडेवाढ द्यावी आणि सरकारी कर्मचाऱ्या दर्जा द्यावा, या मुंबई रिक्षामेन्स युनियनचे नेते शरद राव यांची मागणी आहे. मागणीसाठी रिक्षाचालकांनी मोर्चा, निदर्शने, अघोषित संपाचा दबावाचा प्रयत्न चालवा आहे.
ठाकरे म्हणाले, रिक्षा चालकांच्या मागण्या कायदाबाह्य आहेत. अनधिकृत मीटर लावण्याबाबत शरद राव काहीच बोलत नाहीत. 97 टक्के कारवाई झालेल्या रिक्षा, टॅक्सींमध्ये 95 टक्के उत्तर भारतीय आहेत. अनेक रिक्षा, टॅक्सींना अनधिकृत मीटर आहेत. याविरोधात कारवाईचा विचार केला तर नेते संपाची भीती दाखवतात. त्यामुळे सज्जन रिक्षावाल्यांनी युनियनच्या नेत्यांच्या नादी लागून नये. रिक्षा चालकांच्या मुजोरीस उत्तर देऊ. आजपर्यंत लोकांनी भोगले आहे, उद्या रिक्षावाले भोगतील.'
रिक्षा चालकांची मुजोरी राहिल्यास, शरद राव यांना घरातून बाहेर पडू देणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.
सदस्यता लें
संदेश (Atom)