शुक्रवार, 15 फ़रवरी 2013
कोकणवासीयांनो, जमिनी विकू नका
-
Saturday, February 16, 2013 AT 03:00 AM (IST)
खेड - 'कोकणवासीयांनी जमिनी विकू नयेत. तसे झाल्यास तुमचे अस्तित्वच संपेल. कोकणातील जमिनी स्थानिक नेते, परप्रांतीय, प्रतिष्ठितांनी खरेदी केल्या आहेत किंवा जोरजबरदस्तीने बळकावल्या आहेत. केंद्र सरकारची फेलोशिप मिळालेल्या एका पत्रकाराने लिहिलेल्या अहवालात मालवणमधील माणूस दबावाखाली असल्याचे म्हटले आहे. हा दबाव नारायण राणेंचाच आहे. तो तसा नसेल, तर त्यांनी याचा खुलासा करावा,'' असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे झालेल्या विराट सभेत दिले.
ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातून राज्याच्या दौऱ्याला सुरवात केली. कोकणातील पहिलीच जाहीर सभा त्यांनी आज खेडमध्ये घेतली. त्याचा संदर्भ देताना ते म्हणाले, ""कोकणातील जमिनी विकल्या जात आहेत, हे गंभीर आहे. भीती घालून कोकणात प्रकल्प आणले जात आहेत. गोपीनाथ मुंडेंनी कोकणातील एन्रॉन प्रकल्प समुद्रात बुडविणार असल्याचे सांगितले. नंतर तो तरंगायला कसा लागला? सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा, रत्नागिरी जिल्हा फलोत्पादन म्हणून जाहीर झाला. त्यातील कोणतेच प्रकल्प येथे दिसत नाहीत. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी धरण बांधले जात आहे. त्यासाठी सुरुंग लावले जात आहेत. त्याचा परिणाम रायगड किल्ल्यावर होत आहे.''
मुंबई, नाशिक, पुण्याप्रमाणेच कोकणातही परप्रांतीय घुसल्याचे दाखले त्यांनी दिले. खेडमध्ये अनेक बांगलादेशीयांना झालेल्या शिक्षेचे उदाहरणही त्यांनी दिले.
नक्कल करायला अक्कल लागते नक्कल करून राज्य चालत नाही, असा टोला हाणणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ""नक्कल करायलादेखील अक्कल लागले. फक्त माझ्या हातात एकदा महाराष्ट्र द्या, मग बघा कसा चालवतो आणि हाकतो.''
'जैतापूर'ला विरोध की समर्थन? कोकणातील अनेक प्रकल्पांबरोबरच जैतापूर प्रकल्पही आणण्यात आला. इतर प्रकल्पांना विरोध करताना जैतापूर प्रकल्पाबाबत त्यांना नेमके काय म्हणायचे आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला. ते म्हणाले, ""अणुऊर्जा प्रकल्पामुळे काय होणार आहे? त्सुनामी आली तर ती कोकणात येईल असे नाही. त्सुनामी सांगून येत नाही. जगात शेकडोंनी प्रकल्प आहेत. तारापूरला आहे, मुंबईत मध्यवस्तीत चेंबूर भागात; तर भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर 1960 पासून सुरू आहे. तेथील लोकसंख्या पावणेदोन कोटी एवढी आहे. भूकंप झाला तर एकावेळी किती लोक मरतील, हे सांगणे कठीण आहे; परंतु ते सेंटर अजूनही सुरू आहे.''
परशुराम उपरकर "मनसे'त दाखल खेडमधील या सभेत शिवसेनेचे सिंधुदुर्गचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आपल्या समर्थकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. राज ठाकरे यांनी उपरकर यांच्या हातात पक्षांचा झेंडा दिला. तो झेंडा उपरकरांनी उंच फडकावून पक्षात प्रवेश करीत असल्याची घोषणा केली. उपरकर यांच्याबरोबरच सिंधुदुर्गातील अनेक शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि इतर कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला
मंगलवार, 12 फ़रवरी 2013
टाळी देण्यात स्वारस्य नाही - राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 12, 2013 AT 08:09 PM (IST)
आपल्या एक तासाच्या भाषणात राज यांनी सत्ताधारी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठविली; तसेच शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या टाळीला सध्यातरी प्रत्युत्तर देणार नसल्याचे त्यांचा नामोल्लेख न करता सांगितले. या विषयावर वर्तमानपत्रांतून चर्चा सुरू आहे ते पाहता आपली "एकला चलो रे'चीच भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महालक्ष्मी मंदिर विकासासाठी राज्य शासनाने एक हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणीही राज यांनी या वेळी केली.
तरुणाईने तुडुंब भरलेल्या ऐतिहासिक गांधी मैदानात राज ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा गाजवली. राज ठाकरे म्हणाले, ""राज ठाकरेला मिळाली की मराठी मते फुटतात अशी ओरड होते. ते अत्यंत चुकीचे आहे. ही कुठली पद्धत. कोल्हापूर महापालिकेत कोणाची सत्ता आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची. कोल्हापुरात सर्वांत जास्ती लोक कोण राहतात. त्यांना मतदान कानड्यांनी केले काय? तुमच्यासमोर गैरसमज पसरवून तुम्हाला फसविले जात आहे.'' अल्पसंख्याक भाषक टक्का असेल त्या भाषेत परीक्षा देण्याची मुभा दिली आहे. मराठीबरोबर हिंदी, उर्दूमध्येही परीक्षा देण्याची तयारी सुरू आहे. येथून पुढे त्यांचा टक्का वाढून त्यांना नोकऱ्या मिळणार, याला मनसेचा विरोध असल्याचे राज ठाकरे यांनी बजावले.
टोलनाक्यांविरोधातील आंदोलनाला आपल्याला यश मिळाल्याचे सांगून त्यांनी कर्नाटकातील रस्त्यांचे उदाहरण दिले. स्मारकांचे विषय समोर ठेवून मराठी जनतेला भुलविले जात आहे. महाराजांचे समुद्रात स्मारक बांधण्याऐवजी किल्ल्यांची डागडुजी केल्यास शिवछत्रपतींचा इतिहास जगासमोर मांडता येईल, असा मुद्दा राज यांनी मांडला.
आबांची हजेरी
मनसेची शाखाबांधणी करण्यास निघालेल्या कार्यकर्त्यांना आर. आर. पाटील यांचे कार्यकर्ते धमक्या देतात. त्यांना काम करू देत नाहीत. इतकेच नव्हे; तर त्यांच्या आई-वडिलांनाही धमक्या देतात. हा प्रकार मी यापुढे सहन करणार नाही. यापुढे असे झाल्यास केवळ आर. आर. पाटील यांनाच नाही; तर त्यांच्या घरच्यानांही धमक्या देण्यास माझे कार्यकर्ते मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला
सोमवार, 11 फ़रवरी 2013
मराठीच्या मुद्द्यावर सत्ता आणू - राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 12, 2013 AT 01:15 AM (IST)
श्री. ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आज तिसऱ्या दिवशी सायंकाळी ते कोल्हापुरात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. ते म्हणाले, ""मराठीच्या मुद्द्यावर सत्ता येऊ शकत नाही, म्हणून मी हिंदुत्वाचा मुद्दा जवळ केला, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत. म्हणजे मी त्यांचा मुद्दा खोडून काढत आहे, असा अर्थ घेऊ नका; पण आता काळ खूप बदलला आहे. आजची पिढी खूप स्मार्ट आहे. "बाप दाखव, नाही तर श्राद्ध घाल,' असे ठणकावणारी आजची पिढी आहे. या तरुणाईच्या पाठबळावरच मी हा दावा करीत आहे. आज सत्तेवर येण्यासाठी युती, आघाड्या दिसतात; पण उद्या हेही चित्र बदलेल. सत्तेसाठी त्याची गरज भासणार नाही, यावर माझा विश्वास आहे.''
तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर उद्याच्या सभेत मिळेल, असे सांगून खोचक प्रश्नांना त्यांनी बगल दिली व सभेची उत्सुकता अधिक ताणली. तरीही पत्रकारांनी दुष्काळासंदर्भात छेडले असता ठाकरी बाण्यातच त्यांनी पत्रकारांना फटकारले. ते म्हणाले, ""पन्नास वर्षांनंतरही राज्यातील दुष्काळ हटत नाही. इतकी वर्षे राज्य केले त्यांना याचा जाब न विचारता मला प्रश्न विचारता, हे संयुक्तिक वाटते का?''
ते म्हणाले, ""माझा हा दौरा दुष्काळी भागासाठी नाही. दुष्काळ पडला की दौरा करून दुःखी चेहरा घेऊन मी भेटत नाही. दुष्काळ असो वा बॉम्बस्फोट होवो; काही जण दौरा काढतात आणि दुःखी चेहरा करून खोटी सहानुभूती दाखवतात. तशी मला सवय नाही. मला जी मदत करायची असते, ती गाजावाजा न करता पोच करतो. आजपर्यंत ज्यांना निवडून दिले, त्यांना बंद करा; आपल्याला संधी द्या. सत्ता आली तर माझ्याकडे दुष्काळावर कायमस्वरूपी पर्याय आहे.''
गेल्या पन्नास वर्षांत रुजलेली दोन्ही कॉंग्रेसची मुळे कशी तोडणार, या प्रश्नावर श्री. ठाकरे म्हणाले, ""साखर कारखाना असो वा दूध संघ, शेतकऱ्यांनी पिकवलेच नाही किंवा उत्पादनच घेतले नाही तर त्यांचे अस्तित्व राहील का? कधी तरी उलटा विचार करायला हवा. शेतकऱ्यांनाही कधीतरी निर्णय घ्यावाच लागेल. त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. ते काम मी करीन.''
ते म्हणाले, ""प्यायला पाणी नाही, प्रेमाने वाढवलेल्या जनावरांना चारा नाही, शेतकरी आत्महत्या करताहेत, यापेक्षा पुढचे टोक आणखी काय असू शकते? मी सर्वज्ञ नाही; पण अनेक तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी संपर्क करून पर्याय शोधणे शक्य आहे. गरज आहे ती सत्ता हातात येण्याची. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच माझे विठ्ठल आहेत. त्यांची आणि माझी तुलना होऊच शकत नाही.''
महालक्ष्मी अंगात येणार
श्री. ठाकरे यांची येथील गांधी मैदानात उद्या (ता. 13) सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा होणार आहे. त्या संदर्भात विचारताच ते म्हणाले, ""उद्या महालक्ष्मी अंगात कशी येते, याचे प्रात्यक्षिकच पाहा. स्थानिक प्रश्नांचाही उद्या उलगडा करू.
सदस्यता लें
संदेश (Atom)