दिवंगत शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही
आपल्या पक्षाचे मुखपत्र काढणार आहेत. राज यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत
याबाबत प्रथमच माहिती दिली असून येत्या काही महिन्यांत राज हे 'संपादक' या
नव्या भूमिकेत दिसणार आहेत. राज यांच्या नव्या दैनिकाचे नाव 'मराठा' असेल
असेही सूत्रांनी सांगितले.
बाळासाहेबांनी शिवसेनेवर होणारे 'हल्ले' परतवून लावण्यासाठी 'मार्मिक' हे व्यंगचित्र साप्ताहिक आणि 'सामना' हे दैनिक काढले. या दोन्ही माध्यमांचा बाळासाहेबांनी अत्यंत कुशलपणे वापर करून शिवसेनेचे रोपटे वाढवले. राज्यात सत्ता असताना आणि नसतानाही बाळासाहेबांसाठी 'सामना' हे प्रभावी अस्त्र ठरले. राज आता तोच कित्ता गिरवण्याच्या तयारीत आहेत. मनसेच्या स्थापनेला ८ वर्ष पूर्ण झाली असून या काळात राज यांना अपेक्षित यश मिळालेले नाही. महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहून राजकारणाच्या आखाड्यात उतरलेल्या राज यांच्या पक्षाचा विद्यमान विधानसभेत केवळ एकच आमदार आहे. त्यामुळेच पक्षाची नव्याने बांधणी करताना मनसे कार्यकर्त्यांच्या विधायक कामांना ठळक प्रसिद्धी मिळावी, विरोधकांची टीका परतवून लावता यावी, पक्षाची बाजू मांडता यावी, आपला संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवता यावा, या उद्देशाने राज पक्षाचे हक्काचे दैनिक काढण्याच्या निर्णयाप्रत आले आहेत.
मराठी राजभाषा दिवसानिमित्त मनसेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यासाठी राज यांनी मंगळवारी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होता. या बैठकीत त्यांनी पक्षाचे मुखपत्र काढण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. हे दैनिक मराठी असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
चार महिन्यांपासून चाचपणी
मनसेच्या या नवीन दैनिकाची चाचपणी राज ठाकरे मागील चार महिन्यांपासून करत आहेत. दैनिक चालविण्यासाठी मोठा व्याप करावा लागत असल्याने संबंधितांच्या गाठीभेटी आणि चर्चा केल्यानंतरच राज हे नवीन वृत्तपत्र काढण्याच्या निर्णयाप्रत आल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली.
मुंबई पालिकेच्या निवडणुकांआधी
राज यांच्या नव्या दैनिकाचे नाव 'मराठा' असणार आहे. आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांच्याकडून या नावाचे कायदेशीर हक्क आधीच राज यांनी मिळवलेले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. हे दैनिक मुंबई महापालिकेच्या निवडणुकांआधी सुरू होईल, मात्र नेमका मुहूर्त अद्याप सांगता येणार नाही, असे सूत्रांनी पुढे स्पष्ट केले.