दुष्काळ दौऱ्यावरून राज यांची सरकारवर टीका
नाशिक- पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह निघालेल्या मंत्र्यांच्या भूमिकेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली. शेतकऱ्यांना आज पाणी, गुरांना चाऱ्याची गरज असताना दुष्काळाचे दौरे कसले करता या शब्दात त्यांनी टीका केली.
विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसवरही ते घसरले. पंधरा वर्ष सत्ता असताना जलसिंचनाचे अपूर्ण ठेवलेल्या प्रकल्पांमुळे आज ही वेळ आली आहे त्यामुळे राष्ट्रवादीला दुष्काळी दौरे काढण्याचा व त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याचे ते म्हणाले. सत्ता येऊन वर्ष उलटत आले तरीही सरकारला मांड ठोकता आली नसल्याचा पुनरुच्चार करून ठाकरे यांनी सरकारची अकार्यक्षमता मांडली.
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वनौषधी उद्यानाच्या भुमिपूजनावेळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाने तोंड वर काढले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पाणी व गुरांना चारा पुरविण्याची गरज असताना मुख्यमंत्री व मंत्री दौरे करताय हे चांगले नाही शेतकऱ्यांना नेमके काय हवंय याचा विचार व्हायला पाहिजे. गेल्या वर्षी बीड जिल्ह्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाण्याचे तळे उभारून मदतीचा हात दिला होता. त्याच धर्तीवर काम करण्याची गरज आहे. एकीकडे मला सत्ता द्यायची नाही व दुसरीकडे मनसेची भूमिका काय असे उत्तर देत दुष्काळाच्या विषयाला विनोदी शैलीत श्री. ठाकरे यांनी बगल दिली.
Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही
कोठे प्रयोग झाले का?
तीन वर्षांपूर्वी तत्कालीन वनमंत्री पंतगराव कदम यांच्याकडे नेहरू उद्यानाच्या नूतनीकरणाचा विषय काढला होता, परंतु त्यावेळी या आधी असे प्रयोग कुठे झाला आहेत का? असे उत्तर त्यांच्याकडून मिळाल्याने या एका वाक्यातच प्रकल्प सरकारी कामकाजात का अडकतात लक्षात येते. विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्काळ मान्यता दिल्याने नाशिककरांना गिफ्ट मिळाली आहे, असे सांगून त्याबद्दल ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.