शनिवार, 10 नवंबर 2012

बाळासाहेबांची प्रकृती स्थिर - राज ठाकरे

बाळासाहेबांची प्रकृती स्थिर - राज ठाकरे


Sunday, November 11, 2012 AT 08:22 AM (IST)

मुंबई - "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे,' अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी रात्री अकरा वाजता दिली.

"बाळासाहेबांनी बोलविल्यावरून मी कुटुंबीयांसह त्यांना भेटायला "मातोश्री'वर आलो. त्यांची प्रकृती स्थिर आहे. चिंता करण्याचे काही कारण नाही. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. बाळासाहेबांच्या प्रकृतीबाबत सुरु असलेल्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये,' असेही राज यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, शनिवारी अनेक नेत्यांनी "मातोश्री'वर भेट देऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि देवीसिंह शेखावत यांनी संध्याकाळी बाळासाहेबांची भेट घेतली