ठाणे
- आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) लढविणार असून,
निवडून आलेले खासदार भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना
पाठिंबा देतील, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार) स्पष्ट केले.
राज ठाकरेंनी जाहीर केले लोकसभेचे उमेदवार
दक्षिण मुंबई - बाळा नांदगावकर,
दक्षिण मध्य मुंबई - आदित्य शिरोडकर,
उत्तर पश्चिम मुंबई - महेश मांजरेकर,
कल्याण - राजीव पाटील,
शिरूर - अशोक खांडेभराड,
नाशिक - डॉ. प्रदीप पवार,
पुणे - दिपक पायगुडे
मनसेच्या
आठव्या वर्धापनदिनानिमित्त ठाण्यातील षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रम पार
पडला. यावेळी मनसेचे सर्व आमदार व राज्यभरातून कार्यकर्ते याठिकाणी जमले
होते. 'एम एन एस अधिकृत' या नावाने मनसेच्या अधिकृत ऍपचे उदघाटन राज
यांच्या मातोश्रींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या भारतीय
विद्यार्थी सेनेचे माजी अध्यक्ष अभिजीत पानसे यांनी मनसेत प्रवेश केला.
राज
ठाकरे म्हणाले, ''लोकसभा निवडणूक लढविणार न लढविणार अशी आतापर्यंत
अनेकांची चर्चा सुरू होती. पण, सर्वांना बोलून दिल्यानंतर योग्यवेळी मुसंडी
मारायची असते. आज मी मनसे निवडणूक लढविणार हे स्पष्ट करतो. या निवडणुकीत
माझी काय ताकद आहे, ती सर्वांना दाखवून देणार आहे. आजच्या कार्यक्रमाच्या
निमित्ताने मी मनसेच्या सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आहे. पुढील
दोन ते तीन दिवसांत पुढील यादी जाहीर होईल. लवकरच पहिल्या सभेची तारिख
जाहीर करणार आहे. यावेळी मी सर्वकाही स्पष्ट करणार आहे. आपण सर्वांनी
निवडणुकीच्या तयारीला लागा. मला खात्री आहे, की आपले खासदार निवडून येतील.
निवडून आलेले खासदार भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना
पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देतील. देशाच्या भविष्यासाठी त्यांना पाठिंबा
देणे गरजेचे असल्याचे, मला वाटते.''
सर्वांच्या
सहकार्यामुळे मी पक्ष यापुढेही नेत राहिन. गारपीटीमुळे महाराष्ट्रात
मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने त्वरित सर्व पाहणी करून
शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी. येत्या काही दिवसांत मी गारपीटग्रस्त
भागाचा दौरा करणार आहे. आचारसंहितेचा विषय मधे न घेता सरकारने शेतकऱ्यांना
दिलासा द्यावा, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरेंनी जाहीर केले लोकसभेचे उमेदवार
दक्षिण मुंबई - बाळा नांदगावकर,
दक्षिण मध्य मुंबई - आदित्य शिरोडकर,
उत्तर पश्चिम मुंबई - महेश मांजरेकर,
कल्याण - राजीव पाटील,
शिरूर - अशोक खांडेभराड,
नाशिक - डॉ. प्रदीप पवार,
पुणे - दिपक पायगुडे