मुंबई
- विकास आणि मराठीच्या अजेंड्यावर यश मिळत नसल्याने मनसेचे अध्यक्ष राज
ठाकरे आता हिंदुत्वाचा पट मांडणार आहेत. तसे संकेतच त्यांनी आज दिले. ‘मी
हिंदू आहे आणि हिंदुत्वासाठी उभा राहणार,’ असे सांगत त्यांनी राजकरणात
स्थिरस्थावर होण्यासाठी नवा डाव मांडण्याची तयारी दाखवली.
रुईया
महाविद्यालयातील जाहिरात व पत्रकारिता विभागाच्या कार्यक्रमात राज यांनी
विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मनसेच्या झेंड्यात हिरवा रंग का, असा प्रश्न
विद्यार्थ्यांनी विचारला असता राज म्हणाले, ‘तो रंग भारताला मानणाऱ्या
मुस्लिमांसाठी आहे. अमजद अली खान यांच्या सरोदसाठी व झाकिर हुसेन यांच्या
तबल्यासाठी तो हिरवा रंग आहे. भिवंडी आणि बेहराम पाड्यासाठी तो हिरवा रंग
नाही, अशी भूमिका मांडली. हिंदुत्वाबाबत तुमचा स्टॅंड काय, यावर त्यांनी
राजकारणात नवी चाल खेळणार असल्याचे संकेत दिले. ‘मी हिंदू आहे. धर्मांतर
केलेले नाही. त्यामुळे हिंदुत्वासाठी उभा राहणारच,’ असे सांगात मुंबईतील
मुस्लिम संघटनांच्या मोर्चात महिला पोलिसांना मारहाण झाली होती. त्यानंतर
मी मोर्चा काढला होता. तेव्हा सर्वप्रथम माझ्या पक्षाने विरोध केला होता,
असे सांगत त्यांनी भावी वाटचालीचे संकेत दिले.
Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही, हे वाचा
Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही, हे वाचा