शुक्रवार, 20 अगस्त 2010

'मनसे'चे उर्दू प्रेम!

'मनसे'चे उर्दू प्रेम!
सकाळ वृत्तसेवा
Friday, August 20, 2010 AT 12:30 AM (IST)

मुंबई - मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमझान महिन्यात राजकीय पक्षांचे नेते या समाजाला दरवर्षी "मुबारक' संदेश देतात. इफ्तार पार्टी, होर्डिंग्जच्या माध्यमातून या शुभेच्छा असतात. पण यंदाच्या रमझान महिन्यात मोहम्मदअली रोड येथे "मनसे' ने उर्दू भाषेतून शुभेच्छा संदेशांचे फलक लावल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर जुन्या उमरखाडी तालुक्‍यासह नवीन मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ तयार झाला. या तालुक्‍यातला बहुतांश मतदार मुस्लिम आहे. या विभागात कोकणी मुसलमानही मोठ्या प्रमाणावर राहतात, तरीदेखील मराठीतून एकही होर्डिंग्ज न लावता सर्व फलक उर्दू भाषेतून लावल्यामुळे तो एक चर्चेचा विषय झाला आहे. पूर्वी मनसेने दक्षिण मुंबई विभाग अध्यक्ष आणि त्यातील सहा तालुक्‍यांना उपविभाग अध्यक्ष अशा नेमणुका केल्या होत्या. पण विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या उपविभाग अध्यक्षांना "बढती' देऊन विभाग अध्यक्ष केले. त्यामध्ये मुंबादेवी तालुक्‍यात शरीफ देशमुख या कार्यकर्त्याला विभाग अध्यक्षपदाची "सुभेदारी' देऊन मुस्लिमबहुल विभागाला मुस्लिम पदाधिकारी या अन्य पक्षांच्या फॉर्म्युलाचे अनुकरणच केले गेले.
एकूण 15 ते 20 छोट्या-मोठ्या होर्डिंग्जवर राज ठाकरे चक्क "सूट-टाय' या "साहेबी' पोशाखात दिसत आहेत. सोबत विधानसभेचे मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनाही कॉर्पोरेट लुक देण्यात आला आहे. नेहमीच झब्बा पायजमा या पारंपरिक किंवा शर्ट-पॅन्ट या नॉर्मल कपड्यांत दिसणारा आपला नेता सुटामध्ये पाहून कार्यकर्तेही भुवया उंचावताना दिसत आहेत. मनसेचे मुंबादेवी तालुका अध्यक्ष म्हणतात, स्थानिक नागरिकांना मराठी भाषा कळत नसल्याने त्यांच्याच आग्रहाखातर हे फलक उर्दूतून आहेत. रहिवासी म्हणतात आम्हाला मनसेचे धोरण आवडते. राज ठाकरेंकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पण आम्हाला तुमच्या पार्टीच्या स्थानिक उपक्रमांबद्दल काही कळत नाही.' या भागात बहुतांश कोकणी मुसलमान आहेत की ज्यांना मराठी उत्तम येते आणि अशी इंग्रजी माध्यमातून शिकलेली युवा पिढी आहे की ज्यांना उर्दू येतच नाही. मागील वर्षी भाजपच्या तत्कालीन आमदाराने कुलाबा तालुक्‍यात मोडणाऱ्या कॉफर्ड मार्केट भागात रमझान मुबारकचे फलक लावले होते, पण निवडणूक हरल्यानंतर या वर्षी त्यांचे फलक काही दिसत नाहीत.

बुधवार, 18 अगस्त 2010

Raj Thakre 18.8.10

मराठी चित्रपटांचे खेळ : शिवसेना आणि मनसेत अहमहमिका!

मराठी चित्रपटांचे खेळ : शिवसेना आणि मनसेत अहमहमिका!
मुंबई, १७ ऑगस्ट / प्रतिनिधी
राज्यातील मल्टिप्लेक्समधून मराठी चित्रपट दाखविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार घेतलेला असतानाच शिवसेनेने राज्यातील चित्रपटगृहांत मराठी चित्रपटांचे वर्षभरात ५०० खेळ दाखवलेच गेले पाहिजेत, या मुद्दय़ावरून न्यायालयात धाव घेतल्याने या दोन पक्षांची एकाच मुद्दय़ावरुन अहमहमिका सुरु झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
चित्रपटगृहांमध्ये वर्षभरात किमान ५०० खेळ मराठी चित्रपटांचे दाखविले गेलेच पाहिजेत असा शिवसेनेचा आग्रह असून गेल्या तीन महिन्यांपासून यासाठी शिवसेनेची महाराष्ट्र सिने आणि टेलिव्हिजन सेना न्यायालयीन लढाई लढत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. न्यायालय उद्या याबाबत आपला निर्णय देणार आहे.
मराठी रसिकांना मराठी चित्रपटांचा आस्वाद घेता यावा आणि मराठी निर्मात्यांना आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून व्यावसायिक नफा मिळविता यावा, अन्य राज्यांप्रमाणे राज्यातील चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखविणे बंधनकारक करण्यात यावे, यासाठी जून २०१० पासून लढाई सुरू आहे.
केवळ प्रसिद्धीचे तंत्र अवलंबून आणि पत्रव्यवहार करून हा विषय सुटणारा नसल्याने यासाठी न्यायालयीन मार्गाने यश मिळवावे लागेल, याची शिवसेनेला जाणीव आहे. त्यामुळेच या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेनेने हा विषय न्यायालयात उपस्थित केला आहे. आता या बाबत कोणाला न्यायालयीन मार्ग अवलंबिण्याची उपरती झाली असेल तर ते उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी उपहासाने म्हटले आहे.हिंदी चित्रपटांप्रमाणे मराठी चित्रपटांनाही समान न्याय मिळावा आणि चित्रपटगृह मालकांनी मराठी चित्रपटांसाठी भाडय़ात पूर्णपणे सूट द्यावी अशी मागणीही शिवसेना करणार आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

"मनसे'आमदार प्रवीण दरेकर यांना जामीन

"मनसे'आमदार प्रवीण दरेकर यांना जामीन
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, August 18, 2010 AT 01:15 PM (IST)


मुंबई - कांदिवलीतील "सिनेमॅक्‍स'मध्ये केलेल्या तोडफोडप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार प्रवीण दरेकर यांना न्यायालयाने जामीन दिला आहे.
तत्पूर्वी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी दरेकर यांना "कोर्टऍरेस्ट' करून बोरिवली येथील न्यायालयात हजर केले. त्यावर न्यायालयाने त्यांची 5 हजार रुपयाच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर जामीनावर सुटका केली.

मल्टिप्लेक्‍समध्ये मराठी चित्रपट दाखवले जात नसल्याबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता. मल्टिप्लेक्‍स मालकांचा उर्मटपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगत प्राईम टाईमला मराठी चित्रपट दाखवलेच पाहिजेच असा इशारा दिला होता.

दोन दिवसांपूर्वी कांदिवलीच्या सिनेमॅक्‍स मल्टिप्लेक्‍समध्ये घुसून मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. त्यासंदर्भात पोलिसांनी दरेकरांना आज अटक करून न्यायालयात हजर केले. या प्रकरणी या पूर्वी मनसेच्या 22 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

मंगलवार, 17 अगस्त 2010

मल्टिप्लेक्‍ससाठी 'मनसे'चे आंदोलन योग्यच

मल्टिप्लेक्‍ससाठी 'मनसे'चे आंदोलन योग्यच
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, August 18, 2010 AT 12:15 AM (IST)
 

कोल्हापूर - मराठी चित्रपटांना थिएटर उपलब्ध होत नाहीत. मल्टिप्लेक्‍समध्ये चित्रपट प्रदर्शनाचा नियम असताना तो पाळला जात नाही आणि मुंबईसारख्या शहरात तर मराठी चित्रपटांची पोस्टर्स लावण्यासाठी परवानगी मिळत नाही. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाची घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे स्पष्ट मत अभिनेता भरत जाधव यांनी व्यक्त केले.

"पुन्हा सही रे सही' नाटकाच्या येथील पहिल्या प्रयोगासाठी श्री. जाधव काल येथे आले होते. त्यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने त्यांच्याशी मुक्त संवादाचा कार्यक्रम झाला. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे विशेष सहकार्य लाभले.

मराठी नाटक, चित्रपट, कोल्हापूरची चित्रनगरी अशा विविध अंगांनी हा संवाद रंगला. श्री. जाधव म्हणाले, ""सही रे सही नाटकाला रसिकांनी डोक्‍यावर घेतले. त्याच्याही पेक्षा "पुन्हा सही रे सही' नाटक रसिकांना अधिक भावेल. कारण हे नाटक अतिशय वेगाने पुढे सरकते. चार व्यक्तिरेखा साकारताना टाईम मॅनेजमेंट येथे महत्त्वाची आहे. त्यामुळे काही क्षणात एकापाठोपाठ एक व्यक्तिरेखा नाटकात सादर होतात. कोल्हापूरच्या चित्रनगरीसाठी नेहमीच पाठपुरावा केला. त्याचवेळी वृद्ध कलाकार, तंत्रज्ञांसाठी आश्रम आणि एक छोटा स्टुडिओ साकारण्यासाठी एक एकर जागेसाठी मागणी केली आहे. मात्र "सरकारी काम आणि...' असा अनुभव येत आहे. कोल्हापुरात चित्रपटांची निर्मिती वाढावी यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.''

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, सीमा जोशी, रणजित पाटील, मनोहर कुईगडे, माजी अध्यक्ष प्रफुल्ल महाजन, प्रा. डॉ. शशिकांत चौधरी आदी उपस्थित होते. 
 

सोमवार, 16 अगस्त 2010

'मनसे'ने घातले वर्षश्राद्ध!

'मनसे'ने घातले वर्षश्राद्ध!
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, August 17, 2010 AT 12:30 AM (IST)
 

डोंबिवली - डोंबिवली पूर्व भागातील रेशनिंग कार्यालयाचे उद्‌घाटन होऊन वर्ष उलटले तरी अद्यापि ते सुरू करण्यात आलेले नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी मनसेतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले. मनसेच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी सकाळी चक्क रेशनिंग कार्यालयाचे वर्षश्राद्ध घातले. मनसेचे हे आंदोलन कुतूहलाचे विषय ठरले आणि ते पाहण्यासाठी नागरिकांनीही बरीच गर्दी केली होती.

रेशनिंग कार्यालय नागरिकांच्या सेवेसाठी त्वरित सुरू करावे, अशी मागणी मनसेतर्फे आठ दिवसांपूर्वीच करण्यात आली होती; परंतु रेशनिंग अधिकारी आणि कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. महापालिका आणि रेशनिंग अधिकाऱ्यांनीही 9 ऑगस्ट रोजी केवळ पाहणीचा फार्स केला. त्यानंतर परिस्थिती "जैसे थे'च राहिली. परिमाणी मनसेने रेशनिंग कार्यालयाचे वर्षश्राद्ध घालून महापालिका व रेशनिंग अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रेशनिंग अधिकाऱ्यांना मनसेतर्फे याप्रकरणी एक निवेदनही देण्यात आले.

रेशनिंग कार्यालयाचे उद्‌घाटन 16 ऑगस्ट 2009 रोजी करण्यात आले होते; परंतु ते जनतेसाठी खुले न झाल्याने त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे सांगत करण्यात आलेल्या आंदोलनात मनसेचे शहर अध्यक्ष राजेश कदम, राहुल कामत, शरद गंभीरराव, इरफान शेख, वैशाली दरेकर, दीपिका पेडणेकर, दिलीप भोसले, नगरसेवक सुदेश चुडनाईक आदी नेते-कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राजेश कदम म्हणाले, की डोंबिवली पूर्वेतील रेशनिंग कार्यालयासाठी माजी आमदार हरिश्‍चंद्र पाटील यांनी दहा लाखांचा आमदार निधी दिला होता. खासदारांनी रेशनिंग कार्यालयाला संगणक देण्याचे जाहीर केले होते. उद्‌घाटन होऊन वर्ष उलटले तरी कार्यालय सुरू झालेले नाही. कार्यालयास नळजोडणी आणि वीजजोडणी अद्याप देण्यात आलेली नाही. केवळ या दोन गोष्टींमुळेच कार्यालय सुरू झालेले नाही. महापालिका आणि रेशनिंग अधिकारी जबाबदारी एकमेकांवर ढकलीत आहेत; त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युती केवळ उद्‌घाटनबाजीचा स्टंट करीत आहे, अशी टीकाही कदम यांनी केली केली.

ना-हरकत पत्र केव्हाच दिले!महापालिकेच्या सामान्य प्रसासनाचे उपायुक्त दीपक कुरळेकर यांना याबाबत विचारले असता त्यांनी, रेशनिंग कार्यालयाला वीज व पाणीजोडणी देण्यास आवश्‍यक असलेले "ना-हरकत' पत्र महापालिकेने केव्हाच दिले असल्याचे सांगितले. वीज व पाणीबिल महापालिका भरणार नसून तो खर्च रेशनिंग कार्यालयाने करावा, असेही त्यांनी स्पष्ट केली. 
 

माओवाद्यांनी केली मनसेच्या नेत्याची हत्या

माओवाद्यांनी केली मनसेच्या नेत्याची हत्या
सकाळ वृत्तसेवा
Monday, August 16, 2010 AT 05:24 PM (IST)
 

धानोरा (जि.गडचिरोली) - पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी मनसेच्या तालुका उपाध्यक्षाची गळा चिरून हत्या केली. ही घटना रविवारी (ता.15) च्या रात्री माळंदा येथे घडली. दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या रात्री माओवाद्यांनी धानोरा येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या आवारात तसेच जपतलाई व हेटी या गावातली काळे ध्वज फडकविल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

जंगलू पदा (60 ) असे मृतकाचे नाव असून, ते धानोरा तालुका आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष होते. राज्य शासनाने त्यांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. जंगलू पदा रविवार (ता.15) रात्री घरी झोपले असता 200 ते 250 शस्त्रधारी माओवादी त्यांना झोपेतून उठविले व घराबाहेर नेऊन धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. शनिवारच्या रात्री माओवाद्यांनी धानोरा पोलिस ठाण्यापासून एक किमी अंतरावर ग्रामपंचायतीच्या आवारात काळा झेंडा फडकविला. त्यानंतर गावकऱ्यांनी काळा ध्वज उतरवून त्या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकविला. पोलिस ठाणे तसेच सीआरपीएफ जवान असतानाही धानोरा शहरात माओवाद्यांनी काळा ध्वज फडकविल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 
 


रविवार, 15 अगस्त 2010

मराठी सिनेसृष्टी आज ‘राज’दरबारी!

मराठी सिनेसृष्टी आज ‘राज’दरबारी!
मुंबई, १५ ऑगस्ट/ विशेष प्रतिनिधी
मुजोर मल्टिप्लेक्स मालकांना ‘मनसे’ दणका दिल्यानंतर राज ठाकरे यांनी उद्या मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. मराठी चित्रपट कितीही चांगला असला तरी मल्टिप्लेक्समध्ये त्यांना वेळ दिला जात नाही व दिलाच तर प्राइम टाइम मिळत नाही. यामुळे चांगले मराठी चित्रपट काढूनही मल्टिप्लेक्स मालकांच्या मनमानीमुळे व्यावसायिकदृष्टय़ा यश मिळत नाही. याबाबत राज्य शासनाकडे मराठी चित्रपट निर्माता संघाने अनेकदा साकडे घातल्यानंतरही ठोस निर्णय होत नव्हता. या पाश्र्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मल्टिप्लेक्स मालकांना इशारा दिल्यानंतर शनिवारी दादर, वांद्रे, ठाणे, कांदिवली आदी ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन राडा केला. राज ठाकरे यांनी दिलेला ‘खळ्ळ व फटाक’ इशारा नेमका कसा असतो याची जाणीव मल्टिप्लेक्सच्या मालकांना करून दिली. मल्टिप्लेक्सवाल्यांनाही तीच भाषा समजणार असेल तर त्याच भाषेत समजावले जाईल, या राज ठाकरे यांच्या इशाऱ्याचे तंतोतंत पालन मनसेच्या कार्यकर्त्यांनी केल्यामुळे मराठी चित्रपट निर्माते, अभिनेते तसेच दिग्दर्शकांनी राज ठाकरे यांची अभिनंदन केले. या पाश्र्वभूमीवर उद्या वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे मराठी निर्माते व दिग्दर्शकांना मल्टिप्लेक्स मिळण्याबाबत येणाऱ्या अडचणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे समजून घेणार आहेत.

मराठी दिग्दर्शकांची राज ठाकरें बरोबर बैठक

मराठी दिग्दर्शकांची राज ठाकरें बरोबर बैठक
सकाळ वृत्तसेवा
Sunday, August 15, 2010 AT 02:08 PM (IST)
 
मुंबई - मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट दाखवत नसल्याने शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मल्टिप्लेक्सची तोडफोड केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांची सोमवारी बैठक घेणार आहेत.

मराठी निर्माते आणि दिग्दर्शकांची राज ठाकरेंशी होणारी  बैठक ही वांद्रे येथील एमआयजी कॉम्प्लेक्स येथे होणार आहे. सोमवलमुंबईत मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट दाखविण्यात येत नसल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी दादर-वांद्रे-कांदिवलीसह अनेक ठिकाणच्या मल्टिप्लेक्‍सची तोडफोड केली होती. यानंतर मराठी चित्रपट दाखविण्याचा मल्टिप्लेक्स मालकांना मनसेतर्फे इशाराही देण्यात आला होता. यावरून आज सिनेमॅक्स इन्फिनिटी या मल्टिप्लेक्समध्ये 'ती रात्र' हा चित्रपट दुपारी सव्वाचार वाजता दाखविणार येणार आहे