बई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या "भारताचे भविष्य' या तीनदिवसीय
व्याख्यानमालेच्या कार्यक्रमातील सरसंघचालक मोहन भागवत यांच्या
व्याख्यानातील वक्तव्यावरून काल (ता.19) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे
राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
राज यांनी व्यंगचित्र रेखाटताना मोदी आणि अमित शहा यांना संघाच्या वर्गाबाहेरचे स्वयंसेवक दाखवले आहे, आणि त्यांनी पूर्ण व्यवस्था आपल्या पायाखाली आणण्याचा प्रयत्न चालू केला असल्याचे राज यांना त्यामध्ये सूचित करायचे आहे. तर, एक स्वयंसेवक मोहन भागवत यांनी व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात दिलेले भाषणाचे स्मरण करत असल्याचे दाखवले आहे. आरएसएस ही एक लोकशाहीप्रधान संघटना आहे. संघात कोणा एकाची मालकी चालत नाही. संघ विचारांवर अंकुश ठेवत नाही. संघात विविध स्तरांवर विविध विचारांचे अदान प्रदान केले जाते, असे भागवत यांनी सांगितले होते. त्यावर, संघातील स्वयंसेवक म्हणतो की, भागवतजी आम्हाला आजपर्यंत संघातील शाखेत तुम्ही म्हणत आहात तेच शिकवले गेले आहे. मग या दोघांना म्हणजेच मोदी आणि शहा यांना ते शिकवलं गेलं नाही का ? हे दोघे आपली लोकशाही विसरुन का वागत आहेत, आपली व्यवस्था पायाखाली आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असा प्रश्न त्या स्वयंसेवकांने भागवतांना केला आहे, अशा स्वरुपातील व्यंगचित्र राज यांनी साकारले आहे.