मुंबई
- महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज
(मंगळवार) वाढदिवसानिमित्त एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या फोटो
केकवर सुरी ठेवून तो केक कापण्याचे टाळले.
राज
यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी त्यांनी राज्यभरातून आलेल्या
कार्यकर्त्यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी एका
कार्यकर्त्याने ओवैसी यांचा फोटो असलेला केक आणला होता. हा केक कापून वाद
निर्माण होण्याचे लक्षात येताच त्यांनी ओवैसींच्या गळ्यावर सुरी टेकविली
आणि तेथून निघून गेले.
राज
ठाकरे आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यातील वाद नवीन नाही. यापूर्वीही या
नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केलेली आहे. आगामी महानगरपालिका
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून विविध मुद्दे पुढे आणण्याची शक्यता
आहे.