गुरुवार, 19 जुलाई 2012

राष्ट्रपती निवडणुकीत 'मनसे'ची दांडी

राष्ट्रपती निवडणुकीत 'मनसे'ची दांडी
-
Thursday, July 19, 2012 AT 04:04 PM (IST)

मुंबई- राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत 'मनसे'ने आपलं मत मनातच ठेवलंय.. म्हणजे ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही कळणार नाही! अखेरच्या घटकेला माघार घेत 'मनसे'ने मतदानाला दांडी मारली.

'मनसे'चे आमदार कोणाला मतदान करणार याबाबत राज ठाकरे यांनी मनातली गोष्ट शेवटपर्यंत गुलदस्त्यातच ठेवली होती. त्याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविले जात होते.

'मनसे'चे एकूम बारा आमदार असून, त्यांनी प्रणव मुखर्जी यांना मतदान करावे, यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते. काल (बुधवारी) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही राज ठाकरे यांना दूरध्वनीवरून संपर्क करून मुखर्जींना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार पी. ए. संगमा यांनीही राज ठाकरे यांना पाठिंब्यासाठी आवाहन केले होते. एरवी कोणत्याही विषयावर ठाम भूमिका मांडणाऱ्या 'मनसे'ने यावेळी कोणाचाही टिळा लावून घेण्याचे टाळले. त्यांचा खरा 'मनसे' उमेदवार कोण हे त्यांनाच ठाऊक

बुधवार, 18 जुलाई 2012

उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया

उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया
- सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, July 19, 2012 AT 03:45 AM (IST)

मुंबई - शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी (ता. 20) अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याचे समजते. मनसेचे अध्यक्ष आणि उद्धव यांचे चुलत भाऊ राज ठाकरे या वेळी उपस्थित राहणार असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छेनुसारच दोन्ही भाऊ या आजारादरम्यान एकत्र आले आहेत. 16 तारखेला उद्धव यांच्या आजाराचे स्वरूप काहीसे चिंताजनक असल्याचे स्पष्ट होताच खुद्द बाळासाहेबांनी राज यांना बोलावून घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. माध्यमांनी अलिबाग येथे असलेल्या राज यांना दूरध्वनी केल्याची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये तीन ब्लॉक सापडले आहेत. बायपास किंवा अँजिओप्लास्टी, असे दोन पर्याय डॉक्‍टरांनी ठाकरे कुटुंबीयांसमोर ठेवले होते. त्यातील प्लास्टीच्या पर्यायाची निवड करण्यात आली आहे. गुरुवारी दर्श अमावास्येचा कालावधी संपल्यानंतर उद्या (ता. 19) उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होतील. प्रारंभिक चाचण्या केल्यानंतर शुक्रवारी सकाळी अँजिओप्लास्टी केली जाईल. डॉ. म्यॅथ्यू, डॉ. जलिल पारकर, डॉ. अजित देसाई यांचा चमू शस्त्रक्रिया करेल. बाळासाहेबांनी दूरध्वनी केल्यामुळे राज उपस्थित राहणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान, राज यांनी अलिबाग येथे मनसेच्या शिबिरात बोलताना उद्धव व माझी भेट हा व्यक्तिगत विषय आहे. यात राजकारण आणू नका, असे नमूद केले. मात्र, शस्त्रक्रियेच्या वेळी ते पूर्णवेळ उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे

मुखर्जींना पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरेंशी चर्चा

मुखर्जींना पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरेंशी चर्चा
- सकाळ वृत्तसेवा
Wednesday, July 18, 2012 AT 04:54 PM (IST)
मुंबई - राष्ट्रपतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीहून चर्चा केली.

मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर विधानसभेतील मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांनी या विषयावर चर्चा केली. बाळा नांदगावकर यांनी पाटील यांना राज ठाकरेंशी चर्चा करून सायंकाळपर्यंत निर्णय कळवू असे सांगितले. मनसेचे विधानसभेत १२ आमदार असल्याने, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांच्या १२ मतांना महत्त्व आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक उद्या (गुरुवार) होत आहे. या पदाच्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) पी. ए. संगमा यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे

सोमवार, 16 जुलाई 2012

Uddhav - Raj Thakre


दुरावलेली मने आली जवळ

दुरावलेली मने आली जवळ
Monday, July 16, 2012

मुंबई - शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाने राजकारणातील कडवट नात्याऐवजी रक्ताचे नातेच श्रेष्ठ असल्याचे सिद्ध केले. उद्धव यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्याचे कळताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा कार्यक्रम सोडून अलिबागहून थेट हॉस्पिटल गाठले. आपल्या बंधूची भेट घेत त्यांना प्रकृती सांभाळण्याचा प्रेमळ सल्ला दिला. दुपारी अर्धा तास झालेल्या संवादानंतर सायंकाळी राज यांनी स्वतः सारथ्य करीत उद्धव यांना मातोश्रीवर सोडून आपले बंधुप्रेम दाखविले.

दोन दिवसांपूर्वीच उद्धव यांनी सोमवारी नियमित तपासणीसाठी लीलावतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आज पहाटेच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे सकाळी रश्‍मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी त्यांना तातडीने हास्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर डॉ. अजित देसाई, डॉ. मॅथ्यू, डॉ. मेनन यांनी उपचार सुरू केले. हृदयविकाराची निश्‍चिती होण्यासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेल्या उद्धव यांची अँजिओग्राफी करण्यात आली. अँजिओग्राफीच्या अहवालानंतर अँजिओप्लास्टीचा निर्णय घेतला जाणार आहे.

उद्धव यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे कळताच मनोहर जोशी, गजानन कीर्तिकर, रामदास कदम, एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हे, रवींद्र वायकर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. सुरवातीच्या काळात नेत्यांकडून अथवा हॉस्पिटलकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नसल्याने उपस्थित शिवसैनिकांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र, शिवसेना नेत्यांनी उद्धव यांची अँजिओग्राफी झाली असून, त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितल्यानंतरच उपस्थित शिवसैनिकांचा जीव भांड्यात पडला.

मनसेच्या राज्यस्तरीय तीनदिवसीय शिबिराला अलिबाग येथील हॉटेल रेडिसन्समध्ये आजपासून सुरवात होणार होती. त्याला उपस्थित राहण्यासाठी गेलेल्या राज यांना उद्धव यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे कळताच, त्यांनी तत्काळ मुंबईकडे धाव घेतली. दुपारी राज हॉस्पिटलमध्ये पोचले. अतिदक्षता विभागात उद्धव यांच्याबरोबर त्यांनी संवाद साधला. या वेळी त्यांच्यासोबत शर्मिला ठाकरे यांच्यासह मनसेचे तीन आमदार उपस्थित होते.

डॉक्‍टरांकडून त्यांनी उद्धव यांच्या उपचाराबाबतची माहिती घेतली त्यानंतर राज हॉस्पिटलमधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी थेट सायंकाळी पुन्हा हॉस्पिटल गाठले. उद्धव यांना आपल्या गाडीत पुढे बसवून स्वतः गाडी चालवीत राज यांनी त्यांना मातोश्रीवर सोडले. उद्धव यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

अडचणीच्या काळातील "बंधुप्रेम' राजकारणाच्या सारीपाटावर एकमेकांचे तोंड पाहण्यास तयार नसलेल्या या दोन्ही भावांमधील अडचणीच्या काळातील "बंधुप्रेम' केवळ शिवसैनिक अथवा मनसैनिकांमध्येच नाही, तर राज्यभरात चर्चेचा विषय ठरला.

सकाळी 9.30
उद्धव ठाकरे रुग्णालयात
राज ठाकरे अलिबाग येथील कार्यक्रमासाठी रवाना

सकाळी 11
उद्धव यांच्या प्रकृतीची माहिती कळाल्यानंतर राज दौरा अर्धवट सोडून मुंबईत आगमन

दुपारी 1.30
राज ठाकरे यांच्या आई कुंदाताई, बहिण जयजयवंती लिलावती रुग्णालयात

दुपारी 1.45
राज आणि शर्मिला ठाकरे लिलावती रुग्णालयात; मनसेचे तीन आमदारही बरोबर

दुपारी 2.00
ठाकरे कुटुंबीयांची रुग्णालयात सुमारे 45 मिनीटे चर्चा

दुपारी 2.45
राज ठाकरे यांचा रुग्णालयातून बाळासाहेब ठाकरे यांना फोन

सायंकाळी 5.00
राज-उद्धव लिलावतीमधून मातोश्रीकडे रवाना

रात्री 8.00
गोपिनाथ मुंडे-विनोद तावडे यांची उद्धव यांच्याशी भेट



उद्धव ठाकरेंना नेले राजने 'मातोश्री'कडे

उद्धव ठाकरेंना नेले राजने 'मातोश्री'कडे
- सकाळ वृत्तसेवा
Monday, July 16, 2012 AT 10:58 AM (IST)


मुंबई- शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना आज (सोमवार) सकाळी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अँजिओग्राफीची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास घरी सोडण्यात आले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गाडी चालवत 'मातोश्री' या त्यांच्या निवासस्थानी पोचविले.

उद्धव ठाकरे यांना आज सकाळी छातीत दुखत असल्याने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. याबद्दल माहिती मिळताच त्यांचे बंधू आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे रायगड दौरा अर्धवट सोडून उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यास मुंबईत परतले.

राज ठाकरे यांनी आज दुपारी लीलावती रुग्णालयात उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी पत्नी शर्मिला ठाकरे आणि आई कुंदा ठाकरे याही राज ठाकरे यांच्यासोबत होत्या. राज ठाकरे आज सकाळी अलिबागला कार्यकर्त्यांच्या शिबिराला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. उद्धव ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समजल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांचे शिबिर रद्द करून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले होते. दुपारी ते मुंबईला पोहोचले. त्यानंतर थेट लिलावती रुग्णालयात गेले. तब्बल साडेतीन वर्षानंतर ठाकरे बंधू भेटले आहेत. त्यानंतर ते रुग्णालयातच थांबले होते. सायंकाळी उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज दिल्यानंतर राज ठाकरेंनीच त्यांना घरी पोचविले.

Raj-Uddhav Together 2


Raj-Uddhav Together


आजाराने आणले ठाकरे बंधूंना एकत्र

आजाराने आणले ठाकरे बंधूंना एकत्र
- सकाळ वृत्तसेवा
Monday, July 16, 2012 AT 10:58 AM (IST)

मुंबई- शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना आज (सोमवार) सकाळी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छातीत दुखत असल्याने उद्धव ठाकरे यांना आज सकाळी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थीर आहे.

दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दुपारी लीलावती रुग्णालयात उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी पत्नी शर्मिला ठाकरे आणि आई कुंदा ठाकरे याही राज ठाकरे यांच्यासोबत होत्या. राज ठाकरे आज सकाळी अलिबागला कार्यकर्त्यांच्या शिबिराला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. उद्धव ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समजल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांचे शिबिर रद्द करून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले होते. दुपारी ते मुंबईला पोहोचले. त्यानंतर थेट लिलावती रुग्णालयात गेले. तब्बल साडेतीन वर्षानंतर ठाकरे बंधू भेटले आहेत