मुखर्जींना पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरेंशी चर्चा
- सकाळ वृत्तसेवा
Wednesday, July 18, 2012 AT 04:54 PM (IST)
मुंबई - राष्ट्रपतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत
संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा
देण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीहून चर्चा केली.मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर विधानसभेतील मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांनी या विषयावर चर्चा केली. बाळा नांदगावकर यांनी पाटील यांना राज ठाकरेंशी चर्चा करून सायंकाळपर्यंत निर्णय कळवू असे सांगितले. मनसेचे विधानसभेत १२ आमदार असल्याने, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांच्या १२ मतांना महत्त्व आहे.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक उद्या (गुरुवार) होत आहे. या पदाच्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) पी. ए. संगमा यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें