सोमवार, 14 ऑक्टोबर 2013 - 03:00 AM IST
मुंबई : महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना फटकावण्यासाठी मी पक्षाची स्थापना केली आहे. मराठी माणसांनी एकमेकांची डोकी फोडण्यासाठी नाही, असे खडे बोल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता.13) सुनावले. परळ येथील नरे पार्क क्रीडासंकुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. स्थानिकांना हवे असेल तर नरे पार्कवर क्रीडा संकुल होईलच, अशी ठाम भूमिका त्यांनी या वेळी मांडली.
या क्रीडा संकुलातील स्वीमिंग पूल परिसरातील धनदांडग्यांसाठी बांधले जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्याचाही समाचार राज यांनी घेतला. या स्वीमिंग पूलमध्ये मराठी मुले-मुलीच डुंबतील. परप्रांतीय तेथे आल्यास त्यांना बाहेर काढू, असा टोला त्यांनी लगावला.
शिवडी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजनही या वेळी राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. राज यांनी या वेळी प्रसारमाध्यमांवरही टीका केली. ते म्हणाले, ""या विभागात आज फटाक्यांची माळ लागली होती. त्यातील एखादा फटाका फुटतो का, याकडे यांचे लक्ष लागले होते. पिंडाचे ताट ठेवल्यावर कावळे येतात, तसे येऊन बसले आहेत.'' कॉलम-सेंटिमीटरच्या पत्रकारितेच्या नावाने काय-काय धंदे चालतात, हे चांगलेच कळते. मी मला आणि महाराष्ट्राला हवे तेच बोलतो, असे ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना उद्देशून म्हणाले.
गर्दी कमी
राज ठाकरे यांची सभा म्हणजे तुफान गर्दी असे समीकरण आहे. त्यातच मराठी बहुल विभागात सभा असल्यावर गर्दी होणार, हे अपेक्षित होते. मात्र, या कार्यक्रमाला फारशी गर्दी नव्हती.
शिवसेनेचे शस्त्र म्यान
या कार्यक्रमात शिवसेना आंदोलन करणार, अशी शक्यता होती. त्यामुळे परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मात्र, संध्याकाळी शिवसेनेचा दसरा मेळावा असल्याने या कार्यक्रमाविरोधात शिवसेनेने शस्त्र म्यान केल्याची चर्चा होती.
मुंबई : महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना फटकावण्यासाठी मी पक्षाची स्थापना केली आहे. मराठी माणसांनी एकमेकांची डोकी फोडण्यासाठी नाही, असे खडे बोल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता.13) सुनावले. परळ येथील नरे पार्क क्रीडासंकुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. स्थानिकांना हवे असेल तर नरे पार्कवर क्रीडा संकुल होईलच, अशी ठाम भूमिका त्यांनी या वेळी मांडली.
या
क्रीडा संकुलाच्या मुद्द्यावरून मनसे आणि शिवसेना आमने-सामने आले होते.
मनसेच्या या प्रकल्पाविरोधात शिवसेनेने स्थानिक नागरिकांच्या
स्वाक्षऱ्यांची मोहीमही सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी
शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असताना सकाळी राज यांच्या हस्ते हे भूमिपूजन
होणार होते. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष राज यांच्या भूमिकेकडे लागले होते.
मात्र, त्यांनी हा वाद किरकोळ ठरवला.
स्थानिकांना नरे पार्क येथे क्रीडा संकुल नको असेल तर ते होणार नाही. मात्र, हवे असेल तर होईलच, असे ते म्हणाले. या क्रीडा संकुलातील स्वीमिंग पूल परिसरातील धनदांडग्यांसाठी बांधले जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्याचाही समाचार राज यांनी घेतला. या स्वीमिंग पूलमध्ये मराठी मुले-मुलीच डुंबतील. परप्रांतीय तेथे आल्यास त्यांना बाहेर काढू, असा टोला त्यांनी लगावला.