नाशिक - "माझ्या हातात सत्ता द्या. अख्खा महाराष्ट्र सुतासारखा सरळ
करतो...‘ अशी गर्जना करणाऱ्या राज ठाकरे यांना राज्यात सत्ता मिळाली नाही;
पण ज्या नाशिकने विश्वासाने सत्ता दिली, तेथील कारभाराचे धिंडवडे मात्र
निघाले आहेत. शहराच्या विकासाच्या आडून मते मिळवण्यासाठी कॉर्पोरेट जगताचा
आधार घ्यावा लागला. त्याचवेळी स्मार्ट सिटीमधील "एसपीव्ही‘ला विरोध करत
त्यांनी या जगताच्या मात्र विरोधात सूर आळवला आहे.
Slow Android Phone? Click Here
राज यांची ही दुटप्पी कार्यपद्धती राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. राज यांच्यावर नाशिकच्या विकासासाठी बड्या उद्योग समूहांना निमंत्रित करण्याची वेळ आली. राज यांच्या स्वप्नातील गोदापार्क साकारण्यासाठी रिलायन्स जिओ फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. टाटा उद्योग समूहाच्या प्रयत्नातून बॉटनिकल गार्डनची निर्मिती केली जात आहे. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाला पुनर्जीवित करण्यासाठी एल. ऍण्ड टी. पासून रामोजी फिल्म सिटीपर्यंत अनेक कंपन्यांचे अधिकारी दर महिन्याला स्मारकाची वारी करताहेत. पाथर्डी फाटा ते आडगाव नाका दरम्यानच्या उड्डाण पुलाखालील जागेत झाडे लावण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला निमंत्रण देण्यात आले आहे. सिडकोतील संभाजी स्टेडियम, तारांगण एवढेच काय उद्यानेदेखील खासगीकरणातून विकसित केली जात आहेत.

नाशिकच्या
विकासासाठी भांडवलदारांच्या जिवावर उभारले जाणारे प्रकल्प राज यांना
चालतात; मग "भांडवलदारांसाठी स्मार्ट सिटीचे प्रयोजन‘ हा आरोप कुठल्या
आधारे ते करताहेत, असा थेट प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.