शनिवार, 18 फ़रवरी 2012
आवाज कुणाचा... मराठी माणसाचाच
आवाज कुणाचा... मराठी माणसाचाच!
मृणालिनी नानिवडेकर
Friday, February 17, 2012 AT 09:55 PM (IST)
मराठी माणसाच्या वैभवाची एकमेव खूण म्हणजे मुंबई. अठरापगड भाषकांनी कर्मभूमी केलेल्या मुंबईतला मराठी टक्का कमी झाला; तो उपनगरात ढकलला गेला. मात्र अल्पसंख्येतल्या, जेमतेम 40 टक्के भरणाऱ्या मराठी माणसाला हे महानगर आजही आपले वाटते. महानगराचे अर्थकारण हातात नाही, उच्चभ्रू श्रीमान वस्त्यांमध्ये भूखंड तर सोडाच, साधी सदनिका घेण्याचे बळ नाही, अशा दारुण स्थितीत मराठी माणूस "मुंबईत आमची सत्ता आहे, येथला आवाज आमचा आहे,' या रुबाबात जगत असतो. पानिपतात पराभव झाला तरी अटकेपार झेंडे फडकावले होते ना बच्चमजी! हा इतिहास मराठी माणसाला मुंबईसारख्या अफाट आणि कराल महानगरात जगण्याची झिंग मिळवून देतो. या मानसिकतेची नस सापडलेल्या बाळासाहेबांनी या महानगरावर सत्ता गाजवली. कॉंग्रेसमधील नेतृत्वाच्या बेदिलीमुळे स. का. पाटील, वसंतराव नाईकांपासून ते वसंतदादा पाटील यांच्यापर्यंत सर्वांनाच शिवसेनेच्या या यशाचे श्रेय दिले जाते. या अपश्रेयापासून दूर होण्यासाठी या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसशी आघाडी केली. मतांची बेरीज आपल्याला तारून नेईल,अशा फाजील विश्वासात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी मोठाली विधानेही करून टाकली. मात्र शिवसेनेच्या हातून मुंबई जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आपण कफल्लक होणे आहे, हे मुंबईकरांनी ताडले. कॉंग्रेसप्रणीत आघाडीकडे चाणाक्ष नेते नसल्याने, मराठी माणसाचा हा भयगंड कुणाच्या लक्षातच आला नाही. दुसरीकडे शिवसेना चाणाक्षपणे निवडणुकांना सामोरी गेली. मतांच्या गलबल्यात मराठी टक्का मोठा नाही. त्यामुळे शिवसेनेने मराठी माणसाने एक होण्याचे भावनिक आवाहन उघडपणे केले नाही. चतुर राज ठाकरेंनीही मराठीचे नाणे उघडपणे चालवले नाही. प्रत्यक्षात महापलिकेची निवडणूक मराठी विरुद्ध अमराठी धृवीकरणाभोवतीच फिरली. शिवसेना- मनसेने कुशल खेळी केली.भाजपचे गुजराती वोटही दिमतीला होते. कृपाशंकरसिंह, संजय निरूपम, प्रिया दत्त, नरेंद्र वर्मा असे अमराठी चेहरे हाच आघाडीचा आधार. मात्र जनतेला मतदानाला बाहेर काढण्याची जबाबदारी आघाडीने नेमक्या एका खांद्यावर टाकली नाही. त्यामुळे झोपडीत राहणारा मुंबईतला कॉंग्रेसचा परप्रांतीय मतदार या वेळी बाहेर पडलाच नाही. मराठी माणूस स्वत:हून बाहेर पडला. त्यासाठी उपाययोजना करण्याचे श्रेय उद्धव ठाकरे यांचे.ठाकरेंच्या दोन्ही कुळशाखांना मुंबई-ठाणेकरांनी स्वीकारले. संघटनेच्या बाहेर पडून राज यांनी मिळवलेले यश लक्षणीय ठरले आणि शिवशक्तीला भीमशक्तीची जोड देणारी उद्धव यांची कूटनीतीही. दोघांनाही मिळालेली मते हा मराठी माणसाचा आवाज आहे. लगतच्या ठाण्यात शिवसेना सत्तेत परतत असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसने जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात मिळवलेले यश म्हणजे नव्या मराठी चेहऱ्याला मिळालेली पसंती तर नाही ना, हे तपासून पाहायला हवे.
या कौतुकातच काही प्रश्नही दडले आहेत. पाणी नाही, जागा नाही, स्वच्छता नाही अशा नरकयातनांतील मुंबई जागतिक दर्जाचे महानगर होण्याची भाषा करते आहे. शिवसेनेला हे आव्हान पेलायचे असेल, तर उघड किंवा छुप्या अस्मितेने भागायचे नाही. खरी गरज कृतीची आहे.
सत्तेसाठी लाचारी नाही - राज ठाकरे
सत्तेसाठी लाचारी नाही - राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 19, 2012 AT 04:00 AM (IST)
पुणे
- 'अन्य कोणत्याही पक्षाच्या यार्डात "मनसे'चे इंजिन जाणार नाही; आता
त्यांच्याबरोबर गेलो तर पाच वर्षानंतर कोणाला तोंड दाखवू ? सत्तेसाठी
लाचारी पत्करणार नाही,'' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष
राज ठाकरे यांनी शनिवारी आपली भूमिका स्पष्ट केली.
'पुणेकरांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी आणि माझे नगरसेवक जबाबदारीने काम करू. पुण्यात विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी तांत्रिक बाबी पाहाव्या लागतील. मात्र, पुण्यात पुढील पाच वर्षांत "मनसे' हा विरोधी पक्षाची भूमिका उत्तम प्रकारे बजावेल. प्रशासनावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी मी आणि माझे नगरसेवक पार पाडतील'' असे राज यांनी नमूद केले.
राज यांनी आज पुण्यात येऊन "मनसे'च्या नगरसेवकांची भेट घेतली. त्या वेळी "कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही,' असे राज यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
ते म्हणाले, 'निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढायचे आणि सत्तेसाठी परत प्रतिस्पर्ध्यांशी जुळवून घ्यायचे, हे प्रकार मतदार फार काळ खपवून घेणार नाहीत. मी कोणासोबतही जाणार नाही. आज त्यांच्यासोबत जाऊन पाच वर्षांनंतर कोणाला तोंड दाखवू? या तडजोडी करणे मला पटत नाही. स्वत:चे आणि पक्षाचे काही मत आहे की नाही? मतदारांनी जबाबदारी सोपविली असल्यामुळे काम हे करून दाखवावेच लागणार आहे. निवडणुकीत उभे राहता, मते मागता आणि निवडून येता; मग काम तर करायलाच पाहिजे.''
'प्रचारसभा अधिक घेतल्या असत्या तर जागा निश्चित वाढल्या असत्या,'' असे सांगून ""मी पिंपरी-चिंचवड महापालिकेतही लक्ष घालणार आहे,'' असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथे पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करून राज म्हणाले, 'पुण्यातील निकाल हा अनपेक्षित आणि भारावून टाकणारा आहे. "हेही नको' आणि "तेही नको' म्हणून काही "मनसे'ला मते मिळालेली नाहीत. एक सक्षम पर्याय म्हणून पुणेकरांनी "मनसे'कडे पाहिले आहे. पुण्यातील पायाभूत सुविधा व्यवस्थित मिळण्यासाठी "मनसे'चा अंकुश सत्ताधाऱ्यांवर, प्रशासनावर राहील. आमची जबाबदारी वाढली असून, काम करून दाखवावेच लागणार आहे.''
सोलापूर येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या राजीनाम्यांबाबत "नाराजी असतेच' एवढेच मत राज यांनी मांडले.
'निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षांतील माणसे फोडण्याचे प्रकार योग्य नाहीत; तुमच्याकडे चांगली माणसे नाहीत का?'' असा सवालही राज यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना केला.
'निर्णय मुनगंटीवार घेतात' नाशिक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता राज ठाकरे म्हणाले,
'मी तेथील परिस्थितीची माहिती घेतलेली नाही. उद्या तेथे जाणार आहे. त्यानंतरच पुढील निर्णय घेईन.''
'मनसे'ला पाठिबा देणार नाही,' असे विधान भारतीय जनता पक्षाचे विनोद तावडे यांनी केल्याबाबत राज म्हणाले, 'तावडे असे काही बोलले असतील तर ते माझ्या कानावर आलेले नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे भाजपचे निर्णय सुधीर मुनगुंटीवार घेतात; तावडे नव्हे.''
'पुणेकरांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी आणि माझे नगरसेवक जबाबदारीने काम करू. पुण्यात विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी तांत्रिक बाबी पाहाव्या लागतील. मात्र, पुण्यात पुढील पाच वर्षांत "मनसे' हा विरोधी पक्षाची भूमिका उत्तम प्रकारे बजावेल. प्रशासनावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी मी आणि माझे नगरसेवक पार पाडतील'' असे राज यांनी नमूद केले.
राज यांनी आज पुण्यात येऊन "मनसे'च्या नगरसेवकांची भेट घेतली. त्या वेळी "कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही,' असे राज यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
ते म्हणाले, 'निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढायचे आणि सत्तेसाठी परत प्रतिस्पर्ध्यांशी जुळवून घ्यायचे, हे प्रकार मतदार फार काळ खपवून घेणार नाहीत. मी कोणासोबतही जाणार नाही. आज त्यांच्यासोबत जाऊन पाच वर्षांनंतर कोणाला तोंड दाखवू? या तडजोडी करणे मला पटत नाही. स्वत:चे आणि पक्षाचे काही मत आहे की नाही? मतदारांनी जबाबदारी सोपविली असल्यामुळे काम हे करून दाखवावेच लागणार आहे. निवडणुकीत उभे राहता, मते मागता आणि निवडून येता; मग काम तर करायलाच पाहिजे.''
'प्रचारसभा अधिक घेतल्या असत्या तर जागा निश्चित वाढल्या असत्या,'' असे सांगून ""मी पिंपरी-चिंचवड महापालिकेतही लक्ष घालणार आहे,'' असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथे पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करून राज म्हणाले, 'पुण्यातील निकाल हा अनपेक्षित आणि भारावून टाकणारा आहे. "हेही नको' आणि "तेही नको' म्हणून काही "मनसे'ला मते मिळालेली नाहीत. एक सक्षम पर्याय म्हणून पुणेकरांनी "मनसे'कडे पाहिले आहे. पुण्यातील पायाभूत सुविधा व्यवस्थित मिळण्यासाठी "मनसे'चा अंकुश सत्ताधाऱ्यांवर, प्रशासनावर राहील. आमची जबाबदारी वाढली असून, काम करून दाखवावेच लागणार आहे.''
सोलापूर येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या राजीनाम्यांबाबत "नाराजी असतेच' एवढेच मत राज यांनी मांडले.
'निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षांतील माणसे फोडण्याचे प्रकार योग्य नाहीत; तुमच्याकडे चांगली माणसे नाहीत का?'' असा सवालही राज यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना केला.
'निर्णय मुनगंटीवार घेतात' नाशिक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता राज ठाकरे म्हणाले,
'मी तेथील परिस्थितीची माहिती घेतलेली नाही. उद्या तेथे जाणार आहे. त्यानंतरच पुढील निर्णय घेईन.''
'मनसे'ला पाठिबा देणार नाही,' असे विधान भारतीय जनता पक्षाचे विनोद तावडे यांनी केल्याबाबत राज म्हणाले, 'तावडे असे काही बोलले असतील तर ते माझ्या कानावर आलेले नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे भाजपचे निर्णय सुधीर मुनगुंटीवार घेतात; तावडे नव्हे.''
किंग’ नाही; पण ‘हिरो’ नक्की!
altशिवसेना,भाजप व रिपाईची महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी यांचे आव्हान स्वीकारत केवळ एकटय़ाच्या बळावर लढूनही मनसेचे आध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे, पुणे व नाशिक येथे मिळवलेल्या जागा पाहाता, ‘किंग’ न बनताही राज ठाकरे हे हिरो बनले आहेत. मुंबईत मनसेला तब्बल २८ जागा मिळाल्या तर नाशिकमध्ये ३४ जागा मिळवून प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला. पुण्यातही राज यांना २६ जागा मिळाल्या असून अवघ्या सहा वर्षांच्या मनसेने केवळ राज ठाकरे यांच्या करिष्म्याच्या जोरावर यश मिळविले आहे. मनसेची २००६ साली स्थापना झाल्यानंतर शिवाजी पार्कवर सभा घेण्याचे दाखवलेले धाडस, शिवसेनाप्रमुखांसारखे आक्रमक भाषण करण्याची शैली, खळ्ळ खटॅक आणि नेमकी वेळ साधण्याचे कौशल्य या जोरावर पहाता पाहाता राज यांनी मनसेला लोकप्रियता मिळवून दिली. राज यांच्या शैलीदार भाषणांनी प्रामुख्याने तरुण वर्ग मोठय़ा प्रमाणात प्रभावित झाला. पालिका निवडणुकीत राज यांनी केलेले रोड शो आणि आक्रमक भाषण याच्या जोरावर मुंबईत गेल्या वेळेपेक्षा चौपट जागा मिळवण्यात मनसेला यश आले. मुंबईत गेल्यावेळी मनसेला सात जागा मिळाल्या होत्या तर यावेळी एकटय़ाच्या जोरावर २८ जागा मिळवून दाखवल्या. शिवसेनेने आपली सर्व ताकद मुंबई व ठाण्याची सत्ता राखण्यासाठी एकवटली असताना राज यांनी नाशिक व पुण्यातही जोरदार मुसंडी मारली. नाशिकमध्ये शिवसेनेला चारीमुंडय़ा चीत करत तब्बल ३७ जागा मिळवून मनसे हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला तर पुण्यातही त्यांनी २६ जागा मिळविल्या. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून मनसेची येथे संघटनात्मक बांधणी फारशी नसतानाही मनसेला सात जागी विजय मिळाला. पिंपरी-चिंचवड,उल्हासनगरसह राज्यातील अन्य महापालिकांमध्येही मनसेने खाते उघडले असून या ठिकाणी तर राज ठाकरे प्रचारालाही गेले नव्हते. शिवसेना, आघाडीप्रमाणेच त्यांचेही लक्ष मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे महापालिकेवर होते. मनसेकडे स्टार प्रचारक हे केवळ राज ठाकरे असल्यामुळे या चार महापालिकांमध्ये त्यांना चौफेर प्रचार करावा लागला. पुणे व नाशिक येथील राज यांच्या सभांना जमलेली गर्दी पुरेशी बोलकी होती तसेच ‘रोड शो'लाही जागोजागी प्रंचंड प्रतिसाद मिळाला. माझ्या सभांना गर्दी होते मग मते जातात कोठे असा सवाल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा उपस्थित केला होता. मात्र आपल्या सभांना गर्दीही होते आणि मतांमध्ये त्याचे रुपांतरही होते हा राज ठाकरे यांचा अनुभव पालिका निवडणुकीतही पुन्हा दिसून आला. विश्वास सार्थ करीन- राज ठाकरे मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक महापालिकेत लागलेल्या निकालाबाबत मी समाधानी आहे. मतदारांनी मनसेवर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करीन असे मनसेचे अध्यक्ष राज ठाक रे यांनी आज कृष्णभुवन या आपल्या निवासस्थानी सांगितले. मुंबईत गेल्यावेळी आमच्या अवघ्या सात जागा होत्या त्या चौपट होऊन २८ जागी विजय मिळाला असून शिवसेनेला विजय मिळावा यासाठी आतून कोणी मदत केली का, हे तपासून पाहावे लागेल, असेही ते म्हणाले. युतीमध्ये रिपाईंला घेतल्यानंतर शिवसेनेने भाजपकडे दुर्लक्ष केले होते. मात्र त्यानंतरही भाजपला ३२ जागा मिळाल्यामुळेच सेनेला सत्तेपर्यंत पोहोचणे शक्य झाल्याचा टोला राज यांनी लगावला. मुंबईतील मतदानाचा व मिळालेल्या जागांचा आढावा घेतल्यानंतर शरद पवार यांची महायुतीला मदत झाली का, ते कळेल, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात राज म्हणाले. आज जरी मनसेचा जोर मुंबई, ठाणे, पुणे व नाशिक येथे दिसत असला तरी आगामी का़ळात आपण संपूर्ण महराष्ट्रात जाऊन पक्ष बांधणी बळकट करणार असल्याचे ते म्हणाले
शुक्रवार, 17 फ़रवरी 2012
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात "मनसे'चा शिरकाव
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात "मनसे'चा शिरकाव
- सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 18, 2012 AT 02:00 AM (IST)
नाशिक रोड - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
एकलहरे गटाचे सदस्य हेमंत गोडसे यांनी हा गट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे
कायम राखताना स्वतः महापालिकेच्या विहितगाव प्रभागात विजयी होऊन "मनसे'चा
गट राखतानाच, विहितगाव प्रभागाचा गडही जिंकला आहे. नाशिक रोडला तीन नगरसेवक असलेल्या "मनसे'चा परफॉर्मन्स वाढला आहे. दत्तमंदिर प्रभागात रमेश धोंगडे पुन्हा विजयी झाले असून, त्यांच्या प्रभागात संगीता गायकवाड विजयी झाल्या. जेल रोडला एकमेव महिला नगरसेविका असलेल्या "मनसे'ला या वेळी अशोक सातभाई, शोभना शिंदे यांच्या रूपाने दोन जागा मिळाल्या आहेत. विहितगावची हेमंत गोडसे यांची जागा बोनस मिळाली आहे. एकाचवेळी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांमध्ये प्रभाव दाखवीत हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा नाशिक तालुक्यात शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या ठिकाणी राज करिष्म्याचा प्रभाव निर्माण केला आहे.
नाशिक रोडला प्रभागांची संख्या वाढूनही शिवसेनेची मात्र एक जागा घटली आहे. आमदारांच्या प्रभाव क्षेत्राखालील जागेवर शिवसेना-रिपब्लिकन महायुतीतील बेबनाव झाला. याउलट "मनसे'चे तिन्ही आमदार आपापल्या भागात एकेक डझन नगरसेवक विजयी करण्याच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी झटत असताना नाशिक रोडला मात्र मनसेच्या उमेदवारांना तुलनेने कमीच मदत मिळाली, अशाही स्थितीत "मनसे'ने सहा जागा जिंकल्या.
आठ ठिकाणी क्रमांक दोनवर
पंचक प्रभागात मंदाबाई ढिकले, चेहेडीला कल्पना बोराडे, शिवाजीनगरला सुरेंद्र शेजवळ, भीमनगरला भारती साखरे, जय भवानी रोड प्रभाग 55 मध्ये विक्रम कदम व दर्शना पगारे, सुभाष रोडला महिला गटात संगीता क्षीरसागर, विहितगाव प्रभागात दीपाली कोठुळे, क्रमांक दोनची मते मिळविलेल्या "मनसे'च्या अनेक उमेदवारांची कामगिरी प्रभावी राहिली आहे.
नऊ आजी, 11 माजी नगरसेवक पराभूत
नाशिक रोडला दिनकर आढाव, माया दिवे, सुनील बोराडे, रणजित नगरकर, संजय अडांगळे, सत्यभामा गाडेकर, संतोष साळवे, सीमा ताजणे, लता हांडोरे हे विद्यमान नऊ नगरसेवक, तर रतन बोराडे, सरस्वती भालेराव, निवृत्ती अरिंगळे, उमेश शेलार, रामदास सदाफुले, डॉ. राजेंद्र जाधव, सतीश मंडलेचा, शोभा गायधनी, जयश्री गायकवाड, रईस शेख, लंकाबाई हगवणे हे माजी नगरसेवक पराभूत झाले.
भावी महापौर "मनसे'चाच राहणार : आमदार गिते
आमदार वसंतराव गिते (मनसे, प्रदेश सरचिटणीस)ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच नाशिककरांनी पक्षाला भरभरून प्रेम दिले आहे. यातूनच विधानसभेच्या यशस्वितेनंतर आता महापालिका निवडणुकांतही नाशिककरांनी "मनसे'ला भरघोस प्रतिसाद दिला आहे. येणारा महापौर हा "मनसे'चाच असेल. पक्षाध्यक्ष राज ठाकरे व त्यांच्या उमेदवारांवरील विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. दिलेल्या आश्वासनांची पूर्ती, हे आमचे ध्येय आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आलेले नगरसेवक सदैव जनतेच्या संपर्कात राहतील व त्यांच्या समस्या सोडविण्यात पुढाकार घेतील. याबाबतचा माझ्याकडून वेळोवेळी पाठपुरावा होत राहील.
बुधवार, 15 फ़रवरी 2012
मुंबईतील मराठी मतदार कोणाला साथ देणार?
मुंबईतील मराठी मतदार कोणाला साथ देणार?
राजेश मोरे - सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, February 16, 2012 AT 12:49 AM (IST)
मुंबई - शेवटच्या सभेपर्यंत महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमकपणा कायम ठेवला. मात्र
त्याच वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र आक्रमकपणापासून
सुरुवात करून भावनिक आवाहनात आपल्या प्रचार भाषणांची इतिश्री केली.
मुंबईतील मराठी मतदार मात्र बाळासाहेबांच्या भावनिक आवाहनाला साद देतो की,
राज यांच्या आक्रमकपणाला कौल देतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
बाळासाहेबांनी शिवसेनेच्या शेवटच्या सभेत राज यांच्या विरोधात एकही वाक्य
उच्चारले नाही. पण त्याच वेळी राज यांनी मात्र स्वपक्षातील नेत्यांनाच
"मर्दा'सारखे वागण्याचा आदेश बाळासाहेबांनी द्यावा, असे आवाहन करून आपला
आक्रमकपणा कायम ठेवला. ठाण्यातील सभेत राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या "करून दाखवलं' या कॅम्पेनवर टीकेची झोड उठवून त्याची यथेच्छ टिंगल केली होती. "वरून दाखवलं' असा टोलाही त्यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हवाई छायाचित्रणाच्या आवडीला उद्देशून मारला होता. या टीकेची दखल घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत राज यांना नकला करण्याऐवजी "मर्दा'सारखे समोर येण्याचे आवाहन केले. पण मुंबईतील वांद्रा-कुर्ला संकुलातील सभेत आपण ते मर्दासारखे वागण्याचे वाक्य राज यांना उद्देशून बोललोच नसल्याचा ओझरता उल्लेख बाळासाहेबांनी केला. राज यांचा उल्लेख न करता, मी ते वाक्य त्याच्यासाठी बोललो नसून आघाडीच्या नेत्यांना बोलल्याचा खुलासा बाळासाहेबांनी केला. त्यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी राज यांच्या विरोधात घोषणा दिल्यावरही राजवरील टीका त्यांनी टाळली. फक्त त्यांना झाडू देऊ, असे सांगून शिवसैनिकांच्या घोषणांना बगल दिली. उलट माझ्याकडे संशयाने पाहू नका, कॉंग्रेसला गाडून टाका, पुतळ्याऐवजी गोरगरिबांसाठी टॉवर उभारा अशा भावनिक मुद्द्यांना बाळासाहेबांनी जास्त जागा दिली. आजच्या घडीला मुंबई, ठाणे, नाशिक आदी ठिकाणी शिवसेनेला सर्वाधिक फटका मनसेमुळे बसणार असल्याचे दिसत असतानाही महत्त्वाच्या सभेतच राज यांच्याबाबत बाळासाहेबांनी कोणतीही टीकाटिप्पणी न केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
याउलट बाळासाहेबांच्या ठाण्यातील टीकेला राज यांनी सडेतोड प्रत्त्युतर दिले. मी मर्दासारखाच लढतो आहे, तुमच्या पक्षातील नेत्यांनाच मर्दासारखे लढण्यास सांगा असे सांगितले. माझ्या सभेचे लाईव्ह टेलिकास्ट सुरू झाले की केबलचालकांकरवी केबलच बंद करायची, मुलाखत छापून आली की वृत्तपत्रांचे गठ्ठे गायब करायचे असले धंदे आपण करीत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बाळासाहेबांविषयीचा आपला आदर कायम राहणार असून उद्धव आणि त्यांच्या चारपाच टाळक्यांसाठी एकही पाऊल पुढे टाकणार नसल्याचे सुनावले. मुंबईच्या निकालांचा अंदाज घेताना "त्रिशंकू' परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी किंगमेकर बनण्याची संधी मिळाल्यास उद्धव यांच्यासोबत एकही पाऊल चालणार नसल्याचे स्पष्ट करून मनसेचा राजमार्ग शिवसेनेला समांतरच जाणार असल्याचे राज यांनी स्पष्ट केले आहे
राज ठाकरेंसह वृत्तवाहिनीविरुद्ध गुन्हा दाखल
राज ठाकरेंसह वृत्तवाहिनीविरुद्ध गुन्हा दाखल
- वृत्तसंस्था
Wednesday, February 15, 2012 AT 01:54 PM (IST)
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष
राज ठाकरे आणि मराठी वृत्तवाहिनीविरुद्ध आचारसंहितेचे उल्लंघन
केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर राज ठाकरे आणि एका वृत्तवाहिनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री या वाहिनीवर राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली होती. कलम १८८ अंतर्गत आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आचारसंहितेनुसार निवडणुकीच्या ४८ तासांपूर्वी प्रचार संपविणे आवश्यक आहे. मात्र, राज ठाकरे एक वृत्तवाहिनीवर प्रचार करताना दिसल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सोमवार, 13 फ़रवरी 2012
नादान लोकांसाठी एक पाऊलही पुढे येणार नाही -राज
नादान लोकांसाठी एक पाऊलही पुढे येणार नाही -राज
- सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, February 14, 2012 AT 02:15 AM (IST)
मुंबई - ""तुमच्यासाठी 100 पावले पुढे यायला
तयार आहे; पण या नादान लोकांसाठी एकही पाऊल पुढे येणार नाही,'' असे
प्रत्युत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जाहीर सभेत दिले. बाळासाहेब यांनी
रविवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी एक पाऊल पुढे
यावे, असे आवाहन केले होते. तो संदर्भ घेऊन वरळी येथील सभेत राज यांनी
शिवसेनेला लक्ष्य केले. ""बाळासाहेबांवर आजही माझी श्रद्धा आहे,'' असे सांगत राज म्हणाले, ""शिवसेनेत माझी घुसमट होत होती. निवडणुका जवळ आल्या तरच माझी आठवण होत होती. मला निर्णय घेण्याचा, पदाधिकारी नेमण्याचा कोणताही अधिकार नव्हता. त्यामुळेच मी शिवसेना सोडली. पक्ष सोडणारे सगळे एकाच कारणामुळे असा निर्णय घेत आहेत. त्याचा कधी विचार करणार आहात का?,'' असा प्रश्न राज यांनी बाळासाहेबांना विचारला.
"शहर कात टाकेल,' या पुण्यातील आश्वासनाची राज यांनी मुंबईत पुनरुच्चार केला. मुंबई शहरात राहतो याचा अभिमान वाटेल असे काम मी करून दाखवेन. माझ्यावर विश्वास ठेवा, अशी ग्वाही त्यांनी दिली. 50 वर्षांचा बॅकलॉक 5 वर्षांत भरून काढणे शक्य नाही, पण त्या कामाची झलक तुम्हाला पाहायला मिळेल, असे त्यांनी सांगितले
सदस्यता लें
संदेश (Atom)