नादान लोकांसाठी एक पाऊलही पुढे येणार नाही -राज
- सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, February 14, 2012 AT 02:15 AM (IST)
मुंबई - ""तुमच्यासाठी 100 पावले पुढे यायला
तयार आहे; पण या नादान लोकांसाठी एकही पाऊल पुढे येणार नाही,'' असे
प्रत्युत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जाहीर सभेत दिले. बाळासाहेब यांनी
रविवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी एक पाऊल पुढे
यावे, असे आवाहन केले होते. तो संदर्भ घेऊन वरळी येथील सभेत राज यांनी
शिवसेनेला लक्ष्य केले. ""बाळासाहेबांवर आजही माझी श्रद्धा आहे,'' असे सांगत राज म्हणाले, ""शिवसेनेत माझी घुसमट होत होती. निवडणुका जवळ आल्या तरच माझी आठवण होत होती. मला निर्णय घेण्याचा, पदाधिकारी नेमण्याचा कोणताही अधिकार नव्हता. त्यामुळेच मी शिवसेना सोडली. पक्ष सोडणारे सगळे एकाच कारणामुळे असा निर्णय घेत आहेत. त्याचा कधी विचार करणार आहात का?,'' असा प्रश्न राज यांनी बाळासाहेबांना विचारला.
"शहर कात टाकेल,' या पुण्यातील आश्वासनाची राज यांनी मुंबईत पुनरुच्चार केला. मुंबई शहरात राहतो याचा अभिमान वाटेल असे काम मी करून दाखवेन. माझ्यावर विश्वास ठेवा, अशी ग्वाही त्यांनी दिली. 50 वर्षांचा बॅकलॉक 5 वर्षांत भरून काढणे शक्य नाही, पण त्या कामाची झलक तुम्हाला पाहायला मिळेल, असे त्यांनी सांगितले
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें