शनिवार, 5 फ़रवरी 2011

कल्याण - राज ठाकरेंनी घेतली आयुक्तांची भेट

कल्याण - राज ठाकरेंनी घेतली आयुक्तांची भेट
सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 05, 2011 AT 02:12 PM (IST)
 

कल्याण - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनावणे यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली शहराच्या विकास आराखड्यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करीत शहराचा विकास करताना आर्किटेक्टर विद्यार्थ्यांची मदत घेण्याची सूचना आयुक्तांना केली.

शुक्रवार, 4 फ़रवरी 2011

मराठी तरुणांसाठी मनसेचे रेल्वे भरतीबाबत अभियान

मराठी तरुणांसाठी मनसेचे रेल्वे भरतीबाबत अभियान
सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 05, 2011 AT 12:00 AM (IST)
 
मुंबई - रेल्वे चतुर्थ श्रेणी भरती परीक्षेत मराठी तरुणांना प्राधान्य मिळावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य राजन शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या रेल्वे भरती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत पाच हजार तरुणांनी उमेदवारी अर्ज सादर केल्याची माहिती अभियानाचे आयोजक उपाध्यक्ष बाळ सुर्वे यांनी दिली. 

तरुणांना रेल्वे भरतीत प्राधान्य दिले जात नाही, याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज उठविल्यामुळे रेल्वे भरती परीक्षा मराठीत घेण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला. चतुर्थ श्रेणी पदांसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसाठी मनविसेतर्फे विनामूल्य मार्गदर्शन व सराव शिबिर घेण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक कागदपत्रांसह उमेदवारांनी 10 फेब्रुवारी रोजी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क- अभय थळी- 9773354429, अमोल खाडे- 9869679626, समीर महाराव-9172428343.

राज ठाकरे आज कल्याण कोर्टात

राज ठाकरे आज कल्याण कोर्टात
सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 05, 2011 AT 05:00 AM (IST)
 
कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या वेळी प्रचारादरम्यान निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कल्याण न्यायालयाने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना समन्स बजाविले होते. राज ठाकरे यांना आज (ता. 5) न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार ठाकरे उद्या कल्याण न्यायालयात हजेरी लावणार आहेत. 

आज दुपारी 2 वाजता ठाकरे यांना कल्याण न्यायालयात उपस्थित राहावयाचे आहे. ठाकरे येणार असल्याने न्यायालय परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एक सहायक आयुक्त, चार पोलिस निरीक्षक, 100 पोलिस कर्मचारी व राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. न्यायालयाचा परिसर हा कल्याण स्टेशनपासून जवळ असल्याने त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. ठाकरे न्यायालयात येणार असल्याची माहिती आधीच मनसेच्या कार्यकर्त्याना माहीत असल्याने कार्यकर्त्यांची बरीच गर्दी न्यायालयाच्या परिसरात पाहावयास मिळणार आहे.
न्यायालयात हजर राहण्यापूर्वी ठाकरे प्रथम 12 वाजण्याच्या सुमारास कल्याण डोंबिवली महापालिकेत येणार आहेत. या वेळी ते आयुक्त रामनाथ सोनवणे यांची भेट घेणार आहे. त्यानंतर मनसेच्या नगरसेवकांची भेट घेणार आहे. 31 जानेवारीला ठाकरे डोंबिवलीत आले होते. त्या वेळी त्यांनी मनसे नगरसेवकांची भेट घेतली होती. वेळेअभावी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करता आली नसल्याचे सांगून 5 फेब्रुवारी रोजी भेटणार असल्याचे स्पष्ट केले होते. 5 फेब्रुवारी रोजीही ठाकरे पदाधिकाऱ्यांना भेटणार की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गुरुवार, 3 फ़रवरी 2011





ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले 'मनसे'त

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले 'मनसे'त
सकाळ वृत्तसेवा
Friday, February 04, 2011 AT 12:15 AM (IST)
 

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या सभासदत्वाचा अर्ज त्यांनी भरला आहे. त्यांच्या अर्जानंतर सभासद नोंदणी अभियानास सुरवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे या प्रसंगी उपस्थित होत्या. या संघटनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आहेत.

पाच फेब्रुवारी ते पाच मार्च 2011 या कालावधीत मनोरंजनाच्या क्षेत्रातील अधिकाधिक लोकांनी संघटनेचे सभासद व्हावे, याकरिता ही विशेष सभासद मोहीम राबविण्यात येणार आहे. मुंबईसह अवघ्या महाराष्ट्रातल्या सिने-टीव्ही व नाट्य क्षेत्रातील तंत्रज्ञ, कर्मचारी व कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण कर्मचारी सेनेने सभासद नोंदणीसाठी कंबर कसली आहे, असे शालिनी ठाकरे यांनी सांगितले.

बुधवार, 2 फ़रवरी 2011

'रेल्वे परीक्षेसाठी जास्तीत जास्त मराठी उमेदवारांनी अर्ज भरावेत'

'रेल्वे परीक्षेसाठी जास्तीत जास्त मराठी उमेदवारांनी अर्ज भरावेत'
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, February 02, 2011 AT 12:45 PM (IST)
मुंबई - रेल्वेच्या नोकर भरतीत नेहमीच महाराष्ट्रातील मराठी उमेदवारांना डावलण्यात येते; पण आता यापुढे असे होणार नाही. लवकरच महाराष्ट्रातून सुमारे दहा हजार जागांवर भरती होणार असून, या परीक्षेसाठी जास्तीतजास्त मराठी उमेदवारांनी अर्ज भरावेत. मराठी मुलांनी यासाठी अधिकाधिक रेटा लावला तर मराठी उमेदवारांना कोणी नाकारणार नाही, त्यासाठी अर्ज कसा भरायचा...अर्जासोबत काय जोडावे याची काळजी घ्या, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले. पण रेल्वे परीक्षेचे अर्ज भरताना नीट काळजी घ्या व नंतर बोलू नका, असेही राज यांनी ठणकावले.

मनसेच्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आज राज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या वेळी मध्य रेल्वे व पश्‍चिम रेल्वेच्या 2010-11 च्या संपूर्ण रेल्वे भरतीप्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन राज यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बोलताना ते म्हणाले की, रेल्वेच्या भरतीत नेहमीच मराठी उमेदवारांना डावलण्यात येते, ही आजवरची प्रथा आहे. त्यासाठी आंदोलने करावी लागतात. शिवसेनेत असतानाही आपण अशी आंदोलने केली होती. केंद्रात लालूप्रसाद यादव व रामविलास पासवानांसारखे मंत्री सत्तेत असताना त्यांच्या राजकारणामुळे नेहमीच मराठी उमेदवारांना डावलण्यात आले. पण, रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वे परीक्षा स्थानिक मातृभाषेतून घेण्याचा आदेश दिल्यामुळे त्या-त्या राज्यांतील भूमिपुत्रांचे आता भले होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

रेल्वेमध्ये मराठी युवकांना डावलतात - राज ठाकरे

रेल्वेमध्ये मराठी युवकांना डावलतात - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, February 02, 2011 AT 12:45 PM (IST)
 

मुंबई - रेल्वेमध्ये मराठी युवकांना डावलत असून, भरतीसाठी मराठी युवकांनी भरलेल्या अर्जांचे गठ्ठे इतरत्र फेकून दिल्याचे आढळून आले आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (बुधवार) केला. येथील रवींद्र नाट्यमंदिरात "मनसे'चा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, बिहारी नेत्यांमुळेच रेल्वे भरतीमध्ये तणाव निर्माण होतो. मराठी युवक भरतीसाठी अर्ज भरतात. परंतु, त्यांना नोकरीतून डावलण्यात येते. येत्या १५ फेब्रुवारीपासून पुन्हा रेल्वे भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी मराठी युवकांनी पुन्हा अर्ज भरावेत. भरतीसाठी त्यांना "मनसे'चे कार्यकर्ते मदत करतील. राज्यात रेल्वे भरतीविषयी "मनसे' होर्डिंग्ज लावणार आहे. त्याचबरोबर रेल्वे भरतीविषयी माहितीपुस्तिकाही उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

मंगलवार, 1 फ़रवरी 2011

राज ठाकरे यांनी अनुभवला ‘डोंबिवली फास्ट’चा प्रवास

राज ठाकरे यांनी अनुभवला ‘डोंबिवली फास्ट’चा प्रवास Bookmark and Share Print E-mail
डोंबिवली, ३१ जानेवारी/प्रतिनिधी
चार फुटाचा अरुंद फलाट, लोकलसाठी प्रवाशांची गर्दी, पोलीस बंदोबस्त, बघ्यांनी तीन-चार-पाच क्रमांकाच्या फलाटावर केलेली गर्दी. असे वातावरण आज दुपारी डोंबिवली रेल्वे स्थानकात होते. निमित्त होते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकलने प्रवास करणार असल्याचे.डोंबिवली रेल्वे स्थानकात अचानक पोलीस बंदोबस्त वाढल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचा सूर उमटू लागला. फलाटावर कोण येणार म्हणून चर्चा सुरू झाली. प्रवाशांची ही उत्सुकता ताणली असतानाच आपल्या लवाजम्यासह डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या अरुंद फलाटावरून राज ठाकरे प्रथम श्रेणी डबा जेथे थांबतो, त्या मधल्या जागेत हजर झाले. कल्याणहून डोंबिवली रेल्वे स्थानकात येणारी २ वाजून ४० मिनिटांची लोकल. या जलदगती लोकलने ठाकरे दादरला रवाना होणार होते. यासाठी कार्यकर्त्यांनी प्रथम श्रेणी प्रवासाची पन्नास तिकिटे काढली. मगच ठाकरे यांनी फलाटावर प्रवेश केला.
लोकलच्या मधल्या भागातील प्रथम श्रेणी डब्याने राज ठाकरे प्रवास करणार असल्याने कल्याणलाच मनसे कार्यकर्त्यांनी या डब्यात कोणाला चढू दिले नाही. लोकल डोंबिवली स्थानकात येईपर्यंत समोरील फलाट क्रमांक चारवर तरुणांची मोठय़ा संख्येने गर्दी जमा झाली. त्यात प्रवासी सहभागी झाले. राज ठाकरे यांचे मोबाईलवरून फोटो काढण्यासाठी चढाओढ लागली. काही तरुण फलाटावरील खांबावर चढले तर काही फलाटाच्या किनाऱ्याला येऊन वेगळ्या पोझचे फोटो घेण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना ठाकरे आपल्या हाताने अरे मागे व्हा म्हणून खुणा करत होते. मध्येच एक मोबाईल आला. त्याला त्यांनी हसून उत्तर दिले. स्वारी आज एकदम खुशीत होती, असे एकूण वातावरणावरून दिसून येत होते. महिलांच्या डब्याजवळ मात्र या वाढत्या गर्दीने नाराजी होती.
जलद लोकल फलाटात येताच प्रथम श्रेणीच्या डब्यात प्रथम मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी चढले. ठाकरे यांना बसण्यासाठी जागा ठेवण्यात आली. मग हळूच राज ठाकरे चढले. तोपर्यंत एकाही प्रवाशाने या डब्यात चढण्याचे धाडस केले नाही. ज्यांनी प्रयत्न केला त्यांना, उतरा उतरा म्हणत पिटाळण्यात आले. त्यामुळे ते बिचारे दुसऱ्या डब्यातून प्रथम श्रेणीचा पास असून लटकत प्रवास करू लागले. अखेर लोकल सुटताना तरुणाईला ठाकरे यांनी गर्दीतून डोकावून टाटा केला आणि त्यावेळी एकच जल्लोष झाला.
‘‘२६ वषार्ंनंतर प्रथमच रेल्वेने प्रवास करतोय. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना हार्बर मार्गाने वांद्रे ते शिवाजी टर्मिनस असा प्रवास केला आहे. आता रेल्वे प्रवास करताना अजून तरी रेल्वे ट्रॅकवर आहे हे दिसले,’’ अशी मार्मिक टिपण्णी ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत बोलताना केली.
दोन वर्षे बसने पण प्रवास केला आहे. रेल्वेचा प्रवास सुखकर असतो. वाहतुकीचा कोठे प्रश्न निर्माण होत नाही, त्यामुळे बरा वाटतो. बाहेरचे लोंढे वाढत आहेत, त्या प्रमाणात गर्दीही वाढत आहे. लोकल वाढत आहेत तरी लोंढय़ांमुळे गर्दी वाढतच आहे, असेही ते म्हणाले.
माझ्या खिशात पैसे असल्याने मला एटीएममध्ये जाऊन पैसे काढून तिकीट काढण्याची आवश्यकता भासली नाही, अशी टिपण्णीही त्यांनी राहुल गांधी यांचा नामोल्लेख टाळून केली. या प्रवासात त्यांच्यासोबत आ. नितीन सरदेसाई, आ. बाळा नांदगावकर होते.