बुधवार, 2 फ़रवरी 2011

रेल्वेमध्ये मराठी युवकांना डावलतात - राज ठाकरे

रेल्वेमध्ये मराठी युवकांना डावलतात - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, February 02, 2011 AT 12:45 PM (IST)
 

मुंबई - रेल्वेमध्ये मराठी युवकांना डावलत असून, भरतीसाठी मराठी युवकांनी भरलेल्या अर्जांचे गठ्ठे इतरत्र फेकून दिल्याचे आढळून आले आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (बुधवार) केला. येथील रवींद्र नाट्यमंदिरात "मनसे'चा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, बिहारी नेत्यांमुळेच रेल्वे भरतीमध्ये तणाव निर्माण होतो. मराठी युवक भरतीसाठी अर्ज भरतात. परंतु, त्यांना नोकरीतून डावलण्यात येते. येत्या १५ फेब्रुवारीपासून पुन्हा रेल्वे भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी मराठी युवकांनी पुन्हा अर्ज भरावेत. भरतीसाठी त्यांना "मनसे'चे कार्यकर्ते मदत करतील. राज्यात रेल्वे भरतीविषयी "मनसे' होर्डिंग्ज लावणार आहे. त्याचबरोबर रेल्वे भरतीविषयी माहितीपुस्तिकाही उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें