शुक्रवार, 4 फ़रवरी 2011

राज ठाकरे आज कल्याण कोर्टात

राज ठाकरे आज कल्याण कोर्टात
सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 05, 2011 AT 05:00 AM (IST)
 
कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या वेळी प्रचारादरम्यान निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कल्याण न्यायालयाने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना समन्स बजाविले होते. राज ठाकरे यांना आज (ता. 5) न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार ठाकरे उद्या कल्याण न्यायालयात हजेरी लावणार आहेत. 

आज दुपारी 2 वाजता ठाकरे यांना कल्याण न्यायालयात उपस्थित राहावयाचे आहे. ठाकरे येणार असल्याने न्यायालय परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एक सहायक आयुक्त, चार पोलिस निरीक्षक, 100 पोलिस कर्मचारी व राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. न्यायालयाचा परिसर हा कल्याण स्टेशनपासून जवळ असल्याने त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. ठाकरे न्यायालयात येणार असल्याची माहिती आधीच मनसेच्या कार्यकर्त्याना माहीत असल्याने कार्यकर्त्यांची बरीच गर्दी न्यायालयाच्या परिसरात पाहावयास मिळणार आहे.
न्यायालयात हजर राहण्यापूर्वी ठाकरे प्रथम 12 वाजण्याच्या सुमारास कल्याण डोंबिवली महापालिकेत येणार आहेत. या वेळी ते आयुक्त रामनाथ सोनवणे यांची भेट घेणार आहे. त्यानंतर मनसेच्या नगरसेवकांची भेट घेणार आहे. 31 जानेवारीला ठाकरे डोंबिवलीत आले होते. त्या वेळी त्यांनी मनसे नगरसेवकांची भेट घेतली होती. वेळेअभावी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करता आली नसल्याचे सांगून 5 फेब्रुवारी रोजी भेटणार असल्याचे स्पष्ट केले होते. 5 फेब्रुवारी रोजीही ठाकरे पदाधिकाऱ्यांना भेटणार की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें