नाशिक - महाराष्ट्राच्या आमूलाग्र बदलांपासून तर कार्यकर्त्यांच्या
राहणीमानापर्यंत आणि संवाद साधताना तो कसा असावा, इथंपासून सतत काहीतरी
सांगण्याच्या मूडमध्ये असणारे राज ठाकरे नाशिक दौऱ्यात मात्र फक्त
ऐकण्याच्या मनःस्थितीत दिसले. निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर राज यांच्या
दौऱ्याच्या पहिल्या दिवशीच त्यांचा आब..रुबाब कायम दिसला असला तरी, पूर्वी
इतरांना सांगण्याच्या भूमिकेत दिसणारे "राज‘ आज मात्र इतरांचे ऐकण्यात
जास्त रस घेऊ लागल्याचे जाणवले.
सतत काहीना काही सांगणारे राज आज दिवसभर फक्त ऐकतच होते. बर ऐकावे तरी किती, तर त्यांच्या पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकांचे म्हणणे ते ऐकत होते. त्यामुळे सतत लोकांना सांगणारे ठाकरे आज ऐकण्याच्या मूडमध्ये पाहताना दस्तुरखुद्द मनसे समर्थक कार्यकर्त्यानाही नवखेच होते. काळाचा महिमा असेल कदाचित, पण आजच्या दिवसभराच्या दौऱ्यात इतरांना ऐकणारेच राज ठाकरे दिसले. पक्षात काय चालले हे ऐकून घ्यायला सुरवात केली. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकही त्यांच्यापुढे मोकळा होऊ लागला आहे. राजसाहेबांना, भेटायचे म्हणजे आधी पक्षातील इतर साहेबांना भेटावे लागे. हे पक्षातील दुसरे साहेबच, मनसेतील दुखरी "नस‘ होती. आता ही नस सापडली म्हणूनही असेल, पण स्वतः राज यांनी नगरसेवकांच्या वैयक्तिक गाठीभेटीत रस घेतला.
गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न
नाशिकची एकमेव महापालिका मनसेच्या ताब्यात आहेत. सर्वाधिक 40 जागांवर मनसेचे नगरसेवक मतदारांनी निवडून दिले. नाशिक महापालिकेतील सर्वांत मोठा पक्ष होऊनही मनसेचे नगरसेवकही खूष नाहीत. लोकसभा निवडणुकीपासून उफाळून आलेल्या पक्षांर्तगत कुरबुरी शमलेल्या नाहीत. महापालिकेत महापालिका आयुक्तांशी ते आर्धा तास बोलले. चांगल्या शहराची कल्पना आकाराला यावी. अशी अपेक्षा त्यांनी आयुक्तांकडे मांडली. महापौर, स्थायी सभापती, महापालिका आयुक्तांसह नगरसेवकांना भेटून साधारण गेल्या तीन वर्षांपासून बिघडलेली महापालिकेची गाडी पूर्ववत रुळावर आणण्यासाठी राज यांचा दिवस खर्ची पडला.