शनिवार, 7 नवंबर 2009
सोमवार, 2 नवंबर 2009
खातेवाटपासाठीची रस्सीखेच दुर्दैवी - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Monday, November 02nd, 2009 AT 1:11 PM
..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे.
मुंबई - राज्यातील जनता महागाईने होरपळत असताना केवळ मंत्रीपदासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुरू असलेली रस्सीखेच दुर्दैवी असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केली. बाळा नांदगावकर यांची विधिमंडळातील पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा ठाकरे यांनी केली. उपगटनेतेपदी वसंत गिते यांची, तर पक्षप्रतोदपदी नितीन सरदेसाई यांची नियुक्ती करण्यात आली.
विधानसभेत प्रत्येक आमदाराला मराठीतूनच शपथ घ्यावी लागेल, जो आमदार मराठीतून शपथ घेणार नाही, त्यांना मनसेचे विधानसभेतील शिलेदार त्यांच्या पद्धतीने उत्तर देतील, असा इशाराही त्यांनी दिला. कर्नाटकात कन्नड येत नाही, म्हणून एका आमदाराला मंत्रीपद गमवावे लागले होते, हे सांगत हाच कडवटपणा येथेही दिसला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने मनसेवर जो विश्वास दाखविला. तो मनसेचे आमदार सार्थ ठरवतील, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

रविवार, 1 नवंबर 2009
राज ठाकरे यांचे आज ‘टीम मनसे’ला ‘कोचिंग’ : मनसे विधिमंडळ गटनेतेपदी बाळा नांदगावकर यांच्या निवडीवर होणार शिक्कामोर्तब

संदीप आचार्य
मुंबई, १ नोव्हेंबर
स्पष्ट बहुमत मिळूनही खातेवाटपावरून सरकार स्थापनेचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुरू असलेला घोळ आणि समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी विधानसभेतील कामकाज पत्रिका हिंदूीतून मिळण्याची केलेली मागणी या दोन मुद्दय़ांवरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अपेक्षित असणारी भूमिका म्हणजेच विधानसभा डोक्यावर घेण्याचे काम मनसेचे १३ शिलेदार करणार असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. त्याचप्रमाणे उद्या राज यांच्या कृष्णभुवन या निवासस्थानी होणाऱ्या मनसे आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ गटनेतेपदी बाळा नांदगावकर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत मनसेने १३ जागी विजय मिळविल्यानंतर मनसेविषयी लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. राज ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीतील घणाघाती भाषणे, निवडणुकीनिमित्त जाहीरनामा किंवा वचननामा न देता जाहीर केलेला ‘वचक’नामा या पाश्र्वभूमीवर राज यांच्या १३ शिलेदारांच्या कामगिरीकडे सर्वाचेच लक्ष लागून राहणार आहे. मनसेचे आमदार जर विधानसभेत अभ्यासपूर्ण दरारा निर्माण करू शकले नाहीत तर त्याचा परिणाम आगामी काळात मनसेवर निश्चितपणे होऊ शकतो. या साऱ्याची जाणीव बाळगून कृष्णभुवन या निवासस्थानी उद्या राज ठाकरे यांनी मनसेच्या आमदारांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत गटनेता, उपनेता, प्रतोद आदींची निवड करण्यात येणार आहे. गेली पंधरा वर्षे आमदार असलेले बाळा नांदगावकर यांची नेतेपदी निवड निश्चित मानण्यात येत असून उपनेतेपदी शिशिर शिंदे यांची निवड केली जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मनसेच्या १३ आमदारांपैकी के वळ बाळा नांदगावकर यांना विधानसभेच्या कामकाजाचा पूर्वानुभव आहे तर शिशिर शिंदे यांनी यापूर्वी विधानपरिषद सदस्य म्हणून काम केले आहे. नाशिकचे उत्तमराव ढिकले हे खासदार होते तर वसंत गिते यांनी नाशिकचे महापौरपद भुषविले आहे. या पाश्र्वभूमीवर नव्या आमदारांच्या टीमकडून विरोधी पक्ष म्हणून प्रभावी कामाची अपेक्षा राज ठाकरे बाळगून आहेत. यासाठी उद्याच्या बैठकीत राज यांच्याकडून आमदारांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात वीज, पाणी, बेरोजगारी यासह दिलेली विविध आश्वासने पूर्ण करायला लावण्यासाठी मनसेचे आमदार विधानसभेत आक्रमक राहणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील उद्योग-व्यवसायात मराठी माणसांना शंभर टक्के नोकऱ्या मिळाव्या यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे त्यांची सरकारवरील पकड घट्ट असणार आहे तर भाजपच्या एकनाथ खडसे यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद जाणार असल्यामुळे विरोधी पक्षही सक्षम होणार आहे. भाजपकडे अभ्यासपूर्ण बोलणाऱ्या आमदारांची संख्या जास्त असून मनसेच्या आमदारांना एकाचवेळी सरकार व विरोधीपक्षात राहून सेना-भाजपशी ‘सामना’ करावा लागणार आहे. अबू आझमी यांच्या हिंदी भाषेतून कार्यक्रपत्रिका देण्याच्या मागणीवर राज यांनी आपली भूमिका यापूर्वीच जाहीर केली असल्यामुळे नव्या विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात मनसेचा झटका पहायला मिळणार आहे. मनसेच्या नव्या आमदारांनी विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती घेऊन प्रभावी कामकाज करण्यासाठी सर्व आयुधांचा कशा प्रकारे वापर करायचा यावरही उद्या मार्गदर्शन होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मनसेच्या १३ आमदारांनी राज्यातील विविध प्रश्नांवर प्रभावी भूमिका मांडावी यासाठी आमदारांचे अभ्यासगटही बनविण्यात येणार आहेत. भविष्यात विदर्भ, मराठवाडय़ातही मनसेला वाढण्यास मोठा वाव असल्यामुळे तेथील प्रश्न विधानसभेत मोठय़ा प्रमाणात उपस्थित करण्यात येणार आहेत. नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याची झलक पहावयास मिळेल असा विश्वास मनसेच्या सूत्रांनी व्यक्त केला. विधेयके, तारांकित प्रश्न, लक्षवेधी, अशासकीय ठराव, कपात सूचना, शून्य प्रहरातील औचित्याचे मुद्दे, विविध विषयांवरील चर्चा अशा विविध आयुधांचा वापर मनसेच्या आमदारांकडून अपेक्षित असून या आयुधांचा प्रभावी वापर करून राज यांना अपेक्षित असलेली विधानसभा डोक्यावर घेतील.

सदस्यता लें
संदेश (Atom)