सोमवार, 2 नवंबर 2009

खातेवाटपासाठीची रस्सीखेच दुर्दैवी - राज ठाकरे

खातेवाटपासाठीची रस्सीखेच दुर्दैवी - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 02nd, 2009 AT 1:11 PM
..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे.

मुंबई - राज्यातील जनता महागाईने होरपळत असताना केवळ मंत्रीपदासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुरू असलेली रस्सीखेच दुर्दैवी असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केली. बाळा नांदगावकर यांची विधिमंडळातील पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा ठाकरे यांनी केली. उपगटनेतेपदी वसंत गिते यांची, तर पक्षप्रतोदपदी नितीन सरदेसाई यांची नियुक्ती करण्यात आली.
विधानसभेत प्रत्येक आमदाराला मराठीतूनच शपथ घ्यावी लागेल, जो आमदार मराठीतून शपथ घेणार नाही, त्यांना मनसेचे विधानसभेतील शिलेदार त्यांच्या पद्धतीने उत्तर देतील, असा इशाराही त्यांनी दिला. कर्नाटकात कन्नड येत नाही, म्हणून एका आमदाराला मंत्रीपद गमवावे लागले होते, हे सांगत हाच कडवटपणा येथेही दिसला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने मनसेवर जो विश्‍वास दाखविला. तो मनसेचे आमदार सार्थ ठरवतील, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें