केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे निधन
- वृत्तसंस्था
Tuesday, August 14, 2012 AT 03:47 PM (IST)
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलासराव देशमुख यांचे दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी ग्लोबल रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण करण्यापूर्वी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. केंद्र सरकारमध्ये ते विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री होते.
सहा ऑगस्ट रोजी प्रकृती खालावल्याने विलासराव देशमुख यांना विशेष विमानाने मुंबईतील ब्रिच कॅन्डी रुग्णालयातून चेन्नईला हलविण्यात आले होते. तेथील ग्लोबल रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. प्रारंभी त्यांना लायलेसिस आणि लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर यकृत प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी चेन्नईतील मृत टॅक्सी चालकाचे यकृत घेण्यात येणार होते. टॅक्सी चालकाच्या कुटुंबीयांनी यकृत देण्यास होकार कळविला होता. परंतु, आज यकृत प्रत्यारोपण करण्यापूर्वी त्यांचे निधन झाले