शनिवार, 15 फ़रवरी 2014

केजरीवाल यांच्या राजीनाम्या नंतरची बदललेली राजकीय परिस्तिति

अरविंद केजरीवाल यांनी काळ मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला याचा अंदाज मागच्या २ आठवड्यापासून आल होता , नाहीतरी त्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी "मोकळे "  होण्याचे कारण पाहिजे होते , ते जनलोकपाल च्या निमित्ताने झाले . मुळात ज्या दिवसापासून ते मुख्यमंत्री झाले तेव्हापासून "पता  नाही सरकार कब तक चलेगी " सारख्या ववक़्त्व्यन्नि ते दिसत होते
केजरीवाल यांच्या कालच्या बलिदान मुले (stunt ?) लोकसभेच्या जागांवर बराचसा प्रभाव पडेल असे दिसते , AAP चे उमेदवार ५/१० जागावर निवडून येतील पण  BJP च्या निवडून येणाऱ्या  ३०-४० जागा पडतील ,आणि याचा फायदा कॉंग्रेस ला होईल आणि कॉंग्रेस १५०-१६० जागा जिंकेल , यात दोन शक्यता आहेत १] कॉंग्रेस (सो called  सेकुलर ) front उभा करून SP+BSP+NCP+DMK+AIDMK+TMC+RJD+LEFT असे करून २७२ पर्यंत पोहचतील आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील (कदाचित ) २] आणि जरी BJP १९०-२०० पर्यंत पोहचली तरी बहुमतासाठी ७२ जागा कमी पडतात आणि बाकीचे "so called secular" पक्ष नरेंद्र मोदीन पाठींबा देणार नाहीत किंवा अडवाणी , स्वराज  सारखे सर्वमान्य व्यक्ती  पंतप्रधान साठी उभे राहू शकते आणि त्यांना बाकीचे पक्ष पाठिंबा देऊ शकतात, पण अशा परिस्तितित हा कॉंग्रेस चाच विजय असेल कारण मोदी सोडून bjp चा कुठलाही पंतप्रधान होणे म्हणजे कॉंग्रेस चाच विजय आहे . भाजप ला मोदी सोडून दुसरा कोणीही नको असेल तर मग  पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील ,तोपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल .

गुरुवार, 13 फ़रवरी 2014

टोल भरण्यास जबरदस्ती केल्यास ठेकेदाराच्या घरात धुमशान

मुंबई : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर 21 फेब्रुवारीला टोलविरोधात काढण्यात येणारा मनसेचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. "टोल बंद' आंदोलन मात्र सुरू राहील, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट केले. टोल भरण्यास नकार देणाऱ्या वाहनचालकांवर ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनी जबरदस्ती केल्यास ठेकेदाराच्या घरात घुसून माझे कार्यकर्ते जे थैमान घालतील त्याला आपण जबाबदार नसू, असा इशाराही राज यांनी दिला.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राजसोबत मनसेचे काही नेते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहात गेले होते. त्यानंतर दुपारी "कृष्णकुंज' या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज यांनी ठेकेदारांना वाहनचालकांवर टोलसाठी जबरदस्ती करू नका, असा इशारा दिला. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीही टोलविषयी आश्‍वासने दिली आहेत. या वेळी त्यांचा प्रतिसाद सकारात्मक वाटल्यानेच 21 फेब्रुवारीचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. त्यानंतरही नवे धोरण आणण्याचा दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही तर नागरिकांनी टोल भरू नये, या भूमिकेवर आपण ठाम आहोत, असे राज यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी टोल नाक्‍यावरील कामगारांकडून जबरदस्तीने टोल घेतला जातो, याकडे लक्ष वेधल्यावर अशा संबंधित ठेकेदाराच्या घरात शिरून माझे कार्यकर्ते थैमान घालतील, असा इशारा त्यांनी दिला.
टोलच्या एकूण कारभाराचा लेखाजोखा मांडण्यासाठी ऑडिटरची नेमणूक करण्यात यावी, या मागणीवर आपण ठाम आहोत. लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी एसटी बसना टोल माफ केला जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. बेस्टच्या बसनाही टोल माफ करण्याची आपली मागणी आहे, असे ते म्हणाले. या वेळी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील रस्त्यांमधील फरक दर्शविणारी छायाचित्रे त्यांनी पत्रकारांना दाखविली. टोल न देता कर्नाटकमधील नागरिकांना चांगले रस्ते मिळाले आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणले. आंदोलन वाढत जाईल या धास्तीनेच मुख्यमंत्र्यांनी आज बैठक घेऊन चर्चा केली, असे राज म्हणाले. टोल आकारण्यात येत असलेल्या रस्त्यांवर वैद्यकीय सुविधा नसल्याने अनेकांचा अपघातांत मृत्यू झाला आहे. त्यामुळेच या धोरणात त्रुटी असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले, अशी टीकाही त्यांनी केली.

ठेकेदारांना भेटण्यात रस नाही टोलचे काही ठेकेदार आपल्याला भेटण्यासाठी आले होते का, असे पत्रकारांनी विचारले. त्यावर ठेकेदारांना भेटण्यात आपल्याला रस नाही, असे राज ठाकरे म्हणाले. सरकारबरोबर चर्चा करुन टोलविषयक धोरणावर निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळेच चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्या "मिफ्टा'च्या कार्यक्रमासाठी सिंगापूरला जाणे मी टाळले. या कार्यक्रमाचे प्रायोजक "आयआरबी' असल्याने मी गेलो नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

"मनसेमुळे 67 टोल नाके बंद' मनसेच्या आंदोलनामुळे राज्यात 67 टोल नाके बंद पडल्याचा दावा राज यांनी केला. 10 ऑगस्ट 2012 पासूनच टोलविरोधातील भूमिका मनसेने मांडली असल्याचे त्यांनी सांगितले. टोलविरोधी आंदोलनात मी सरकारविरोधात बोलत असताना विरोधक मात्र माझ्याच विरोधात बोलत आहेत, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भाषा सरकारला कळली नाही. त्यामुळेच आमच्या आंदोलनानंतर सरकारला जाग आली, असे ते म्हणाले.

येथे होते दामदुप्पट वसुली सरकारचे नियम धाब्यावर बसवून दामदुप्पट वसुली सुरू आहे, असा दावा राज यांनी केला. कागल - सातारा रस्त्यावर सरकारी सूत्रांप्रमाणे 62 रुपये टोल अपेक्षित असताना 124 रुपये घेतले जातात. आणेवाडी (सातारा) - खेड शिवापूर रस्त्यावर 24 रुपये अपेक्षित असताना 50 रुपये, खेड शिवापूर - पुणे रस्त्यावर 15 रुपये अपेक्षित असताना 70 रुपये, मुंबई - पुणे रस्त्यावर 53 रुपये अपेक्षित असताना 87 रुपये, पुणे - शिरुर रस्त्यासाठी 30 रुपये अपेक्षित असताना 37 रुपये, शिरुर - नगर रस्त्यासाठी 26 रुपये अपेक्षित असताना 35 रुपये, नगर - औरंगाबाद रस्त्यासाठी 58 रुपये अपेक्षित असताना 75 रुपये, औरंगाबाद- जालना रस्त्यासाठी 32 रुपये अपेक्षित असताना 50 रुपये, मुंबई - पुणे (एनएच 4) - नगर - औरंगाबाद-जालना रस्त्यासाठी 205 रुपये अपेक्षित असताना 284 रुपये, पुणे - बेळगाव रस्त्यासाठी 167 रुपये अपेक्षित असताना 294 रुपये, मुंबई-पुणे-बेळगाव रस्त्यासाठी 240 रुपये अपेक्षित असताना 381 रुपये टोल घेतला जातो, असा आरोप राज यांनी केला.

टोल भरणार नाहीच!- राज

आम्ही असं करू, अमुक निर्णय घेऊ, असं राज्य सरकार सातत्यानं सांगत असतंच. टोलप्रश्न निकाली काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आज दिलंय. परंतु, त्यांची आश्वासनं पूर्ण होईस्तोवर आम्ही टोल भरणार नाही आणि जनतेनंही तो भरू नये, अशी ठाम भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट केली.

कुठल्याही टोल नाक्यावरचा कुणीही कर्मचारी धमकावून टोल वसूल करत असेल, तर मनसे त्या कंत्राटदाराच्या घरी थैमान घालेल. मग सरकारने आम्हाला दोष देऊ नये, असंही राज यांनी बजावलं.

अर्थात, टोल न भरण्याचा त्यांचा इरादा पक्का असला, तरी टोलधाडीविरोधात २१ फेब्रुवारीला मंत्रालयावर काढण्यात येणारा मोर्चा त्यांनी पुढे ढकलला आहे.

बुधवार, 12 फ़रवरी 2014

राज ठाकरे यांची पोलिसांकडून सुटका

राज यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन वाशी टोलनाक्यावर स्वतः आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज सकाळी ते आपल्या कृष्णकुंज या निवासस्थानातून पत्नी शर्मिला व मुलगा अमितसह वाशी टोलनाक्याकडे निघाले. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो मनसे कार्यकर्ते व आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई होते. पोलिसांनी यांचा ताफा चेंबूर येथे अडवून त्यांच्यासह नांदगावकर व सरदेसाई यांनाही अटक करण्यात आली. पण, दीड ते दोन तास आरपीएफ पोलिस ठाण्यात ठेवल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

''मुख्यमंत्र्यांनी मला दूरध्वनी करून मला चर्चेसाठी आमंत्रण दिले असून, मी उद्या (गुरूवार) सकाळी नऊ वाजता त्यांच्या भेटीसाठी जाणार आहे. यावेळी मी माझे म्हणणे मांडणार आहे व त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शांतता राखावी,'' असे सुटका झाल्यानंतर राज ठाकरे यांनी सांगितले.

मंगलवार, 11 फ़रवरी 2014

चेंबूरजवळ राज ठाकरेंना अटक; आरसीएफ पोलीस ठाण्यात नेले

राज ठाकरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं... चेंबूर टोलनाक्याजवळ राज समर्थकांची घोषणाबाजी... बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईही पोलिसांच्या ताब्यात... वाशी टोलनाक्याकडे जाताना चेंबुरजवळ राज ठाकरेंच्या ताफ्याला पोलिसांनी अडविले. पोलिसांकडून बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाईंना समजाविण्याचा प्रयत्न केले. तरीही पोलिसांनी पुढे जाण्यास अडविले त्यानंतर स्वत: राज ठाकरे पोलिसांशी चर्चेसाठी गेले असता पोलिसांनी राज ठाकरेंना त्यांच्या गाडीत बसण्याचे आदेश दिले. अशाप्रकारे राज ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
बजाविलेल्या नोटीसचे उल्लंघन केल्याचे सांगत राज ठाकरेंना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांना आरसीएफ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
* मनसे नेते कप्तान मलिक यांना वी.बी.नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
* दहिसर उड्डाणपुल मनसैनिकांनी चक्का जाम करत पूर्णत: बंद पाडला आहे.
* मुंबई-आग्रा महामार्गावर जोरदार नारेबाजी सुरू असून महामार्गावरील वाहतूकीचा खोळंबा झाला आहे.
* मुंबई मनसे आमदार राम कदम यांना पार्क साईट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
* प्रविण दरेकर, शालिनी ठाकरे आणि संजय घाडी यांना दहिसर टोलनाक्यावर अटक
* मनसे नेते शिशिर शिंदेंना जोगेश्वरी लिंकरोड परिसरात अटक

आज रस्त्यावर 'राज'

टोलप्रश्‍नी राज्यातील महामार्गांवर मनसेचा "रास्ता रोको'

मुंबई- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयातून टोलवसुलीवर चर्चा करण्याचे आमंत्रण देण्यात आले असले तरी यापूर्वीही चर्चेतून टोलवसुलीवर मार्ग निघाला नसल्याने उद्या (ता. 12) राज्यभरातील महामार्गावर टोलवसुलीच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिली. राज यांच्या नेतृत्वाखाली वाशी टोल नाका येथे "रास्ता रोको' करण्यात येणार आहे.

टोलप्रश्‍नी उद्या (बुधवारी) राज्यात करण्यात येणाऱ्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी राज यांनी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद बोलावली होती. राज ठाकरे म्हणाले, की राज्यभरातील रास्ता रोकोचा शहरांतील नागरिकांना त्रास होणार नसून केवळ महामार्गावर राज्य भरात रास्ता रोको होणार आहे. तसेच या आंदोलनानंतर 21 फेब्रुवारी रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानदरम्यान टोलवसुलीच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्यभरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. लोकशाही मार्गांनी सरकारला जाग आली नाही तर मात्र मनसेच्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देऊन ते म्हणाले, की मुख्यमंत्र्यांना राज्यातील प्रश्‍नांमध्ये नव्हे तर आघाडीच्या जागावाटपात जास्त रस आहे. तसेच शिवसेनेने या आंदोलनाला "नाटक' म्हणून संबोधले असले तरी सध्या या टीकेवर उत्तर देणार नाही. मनसेच्या आंदोलनामुळे राज्यातील 67 टोल नाके बंद झाले आहेत.

राज ठाकरेंना नोटीस मनसेने टोलप्रश्‍नी रास्ता रोकोचा इशारा दिल्यानंतर आज राज्यभरातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी 149 कलमाच्या नोटीस बजावल्या आहेत. यानुसार जमावासह जमा होण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवाजी पार्क पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी राज यांनाही नोटीस बजाविली आहे.

भुजबळांशी चर्चा नाही
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ टोलवसुलीबाबत खुल्या चर्चेला तयार असल्याबाबतचा प्रश्‍न राज यांना विचारण्यात आला. त्या वेळी दरोडेखोरांबरोबर कोण चर्चा करणार, असा प्रश्‍न त्यांनी केला. ज्यांच्याबद्दल आक्षेप आहेत, त्यांच्याशी चर्चा करण्यात आपल्याला रस नसल्याचे ते म्हणाले. हा विषय मुख्यमंत्र्यांबरोबर संबंधित असल्याने त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

राज म्हणाले
- खळ्ळखट्याक नाही
- शहरातील जनजीवन विस्कळित करणार नाही
- बारावीच्या परीक्षेमुळे शहरांमध्ये रास्ता रोको नाही.
- पत्रकारांच्या उपस्थितीत सरकारशी चर्चा करणार
- उपाययोजना करण्यात येत असेल तरच चर्चेला येणार
- भास्कर जाधव यांना कोणीतरी सांगितले म्हणून पत्र लिहिले.

Raj thakre Press conference video


रविवार, 9 फ़रवरी 2014

राज ठाकरे Pune sabha Video


हिंमत असेल तर अटक करून दाखवा : राज ठाकरे

पुणे- "राज्यातील खोटे टोल नाके बंद होत नाहीत आणि जोपर्यंत सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत टोल नाक्‍यांविरोधातील आंदोलन सुरूच राहणार,'' अशी टोलविरोधी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करून ""येत्या बुधवारी (ता. 12) संपूर्ण राज्यभर टोलच्या विरोधात "रस्ता रोखो' आंदोलन पक्षाच्या वतीने करण्यात येईल. हिंमत असेल तर अडवून दाखवा आणि मला अटक करून दाखवा,'' असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला.

पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर मनसेच्या जाहीरसभेत राज ठाकरे बोलत होते. या वेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, माजी आमदार दीपक पायगुडे आदी उपस्थित होते. आज प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आलेलो नाही, तर त्याच नारळाने सरकारचे टाळके फोडण्यासाठी आलो आहे, असे सांगून ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज्यातील आघाडी सरकारबरोबरच शिवसेनेवरही टीका केली.

टोल नाक्‍यांच्या माध्यमातून चालणाऱ्या "झोल' दर्शविण्यासाठी ठाकरे यांनी सभेच्या ठिकाणी माहिती अधिकारात मागविलेली कागदपत्रे सादर करून आपण हाती घेतलेले आंदोलन योग्य असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. तर "टोलबद्दल बोलणारे राज ठाकरे आता गप्प का झाले,' असे विचारणाऱ्यांना "मला विकत घेणारा अजून पैदा व्हायचाय,' असे उत्तर दिले.

मी इतका अव्यवहार्य नाही, राज्य सरकार चालविण्यासाठी पैसे लागतात, हे मलादेखील माहिती आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले, ""मोडतोड नको म्हणून टोल नाक्‍यांबद्दल मुख्यमंत्र्यांकडे गेलो, तर ते म्हणाले आघाडीचे सरकार आहे, माझे हात बांधले आहेत. न्यायालयात गेलो, तर तारीख पे तारीख. सगळ्या मार्गाने प्रयत्न केले. माझ्या पूर्वीही ज्यांनी न्यायालयात टोलविरोधी दावे दाखल केले आहेत. ते दावे सुनावणीसाठी अजूनही उभे राहिले नाहीत. टोल नाक्‍यांवर जो पैसा गोळा होतो, तो जातो कुठे हेदेखील विचारायचे नाही. ते जर मंत्र्यांच्या घरात जात असतील, तर आम्ही टोल भरणार नाही. रोज जाणाऱ्या-येणाऱ्यांनी निवडणुकीचा फंड यांना द्यायचा का?''

भाजपचे सरकार असलेल्या राज्यातील टोल नाके आधी बंद करा, या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या आरोपाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, ""कर्नाटक आणि गुजरात राज्यातील टोल नाक्‍यांना मी भेट दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या नियमानुसार तेथे टोलची वसुली होते. टोलची रक्कमही कमी आहे. सुविधादेखील तेवढ्या देतात. ती पारदर्शकता महाराष्ट्रात नाही. केंद्राच्या नियमानुसार 80 किलोमीटरनंतर टोलनाका असला पाहिजे.
महाराष्ट्रात तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरच टोल नाके आहेत. महाराष्ट्रात रस्त्यांसाठी 13 प्रकारचे कर आपण भरतो. त्यातील एकट्या मोटार वाहनकरातून गेल्या अकरा वर्षांत 22 हजार 266 कोटी महसूल राज्याला मिळाले. असे असताना
14 वा टोलचा कर कशाला.''

पोलिसांचा समाचार घेऊन ठाकरे म्हणाले, "मंत्री आणि पोलिसांच्या गाड्यांवरील लाल-पिवळे दिवे कोणत्याही दुकानात मिळतात. त्यातून गुन्हे घडले तर काय करणार. त्यासाठी राज्य सरकार खमके पाहिजे.'

शिवसेनेवरही टीका
सरकारच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध मी राज्य सरकारविरोधात लढत असताना शिवसेना मात्र माझ्यावर टीका करीत आहे. ते सरकारच्या विरोधात आहेत की सत्ताधारी. ही परिस्थिती पाहून गरगरायला होते, अशी टीकाही राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केली. एकीकडे शिवसेनेवर टीका करताना त्यांनी उद्धव ठाकरे किंवा कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नाही.

राज ठाकरे उवाच...
मला विकत घेणारा पैदा व्हायचाय
मुख्यमंत्री म्हणतात, माझे हात बांधलेत
मुख्यमंत्री म्हणजे बिनपगडीचे मनमोहनसिंग
कोर्टात टोलबाबत "तारीख पे तारीख'
टोलचा पैसा मंत्र्यांच्या घरात जातो
केवळ रस्त्यांसाठी आपण 13 कर भरतो
मोटारवाहन करातून 22,266 कोटींची कमाई
टोलच्या नावाखाली तुमची फक्त फसवणूक
महाराष्ट्रात साधी बाथरूमचीही सोय नाही
सुप्रिया सुळेंनी सांगितलंय, मंत्र्यांच्या गाड्या फोडा. ठीक आहे उद्यापासून "चुन-चुन के मारूंगा'