राज
ठाकरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं... चेंबूर टोलनाक्याजवळ राज
समर्थकांची घोषणाबाजी... बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईही पोलिसांच्या
ताब्यात... वाशी टोलनाक्याकडे जाताना चेंबुरजवळ राज ठाकरेंच्या ताफ्याला पोलिसांनी
अडविले. पोलिसांकडून बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाईंना समजाविण्याचा
प्रयत्न केले. तरीही पोलिसांनी पुढे जाण्यास अडविले त्यानंतर स्वत: राज
ठाकरे पोलिसांशी चर्चेसाठी गेले असता पोलिसांनी राज ठाकरेंना त्यांच्या
गाडीत बसण्याचे आदेश दिले. अशाप्रकारे राज ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन
सरदेसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बजाविलेल्या नोटीसचे उल्लंघन केल्याचे सांगत राज ठाकरेंना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांना आरसीएफ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
* मनसे नेते कप्तान मलिक यांना वी.बी.नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
* दहिसर उड्डाणपुल मनसैनिकांनी चक्का जाम करत पूर्णत: बंद पाडला आहे.
* मुंबई-आग्रा महामार्गावर जोरदार नारेबाजी सुरू असून महामार्गावरील वाहतूकीचा खोळंबा झाला आहे.
* मुंबई मनसे आमदार राम कदम यांना पार्क साईट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
* प्रविण दरेकर, शालिनी ठाकरे आणि संजय घाडी यांना दहिसर टोलनाक्यावर अटक
* मनसे नेते शिशिर शिंदेंना जोगेश्वरी लिंकरोड परिसरात अटक

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें